dragon fruit farming in sangli farmer demand goods and expenses less in this type of farming 
कोल्हापूर

दुष्काळी भागात फुलवले नंदनवन ; अडीच एकरात ड्रॅगन फ्रूटची शेती

राजू पुजारी

संख (सांगली) : जत तालुक्‍यातील सोन्याळजवळ लकडेवाडी या कायम दुष्काळी, खडकाळ माळरानात चंद्राम पुजारी व अवण्णा पुजारी यांनी ड्रॅगन फ्रूट शेतीचा यशस्वी प्रयोग केला. ठिबक सिंचनवर त्यांनी अडीच एकरात ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे. कमी पाणी, कमी खते, कमी खर्च आणि विशेष म्हणजे हमखास मागणी असलेले पीक घेऊन शेतकऱ्यांसमोर एक आदर्श घालून दिला आहे. नावीन्याचा ध्यास आणि शेतीला आधुनिकतेची जोड देऊन पुजारी बंधूनी धाडसाने ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे.

सोन्याळपासून तीन किलोमीटरवर लकडेवाडी आहे. चंद्राम लायप्पा पुजारी यांनी पूर्वांपार शेती पद्धतीला बगल देत आधुनिक शेतीची वाट चोखाळली. पुणे येथून रोपे आणून अडीच एकरात लागवड केली. दीड एकराचा मळा बहरला आहे. जत दुष्काळी म्हणून ओळखला जातो. दुष्काळाच्या झळा सहन करणारा तालुका म्हणून पाहिले जाते. पावसाचे प्रमाण आणि थंडीही कमी. पारंपरिक पद्धतीनेच शेती केली जाते. नवीन प्रयोग क्वचित यशस्वी होतो. 

पुजारींची एक एकर डाळिंब बाग होती. दुष्काळ, टंचाईने वाया गेली. नुकसान झाले. शेतीतून बाहेर पडण्याचा विचार ते करीत होते. त्यांना ड्रॅगनची माहिती मिळाली. पहिल्यांदा दीड एकरात ११ फूट रुंद व ७ फूट लांब अंतरावर लागवड केली. पाण्यासाठी कूपनलिका घेतली. पाणी कमी असल्याने शेततळे तयार करून ठिबकचा वापर केला.

पारंपरिक पिकांना फाटा 

ज्वारी, बाजरी, तूर, मका व इतर कडधान्ये पुजारी घेत. सततचा दुष्काळ, पावसाचा असमतोलामुळे बहुतांश शेती कोरडवाहू होती. नापिकीचा सामना करावा लागे. चंद्राम व बंधू अवण्णा पुजारींनी ड्रॅगनविषयी कृषी तज्ज्ञांकडून माहिती घेतली. प्रथम दीड, नंतर आणखी एक एकर लागवड केली. रोपे, सिमेंटचे चौकोनी ठोकळे, खांब, ठिबक सिंचनचा खर्च पाच लाख आला.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Strike Rate: महायुतीचा जबरदस्त स्ट्राइक रेट! काय ठरले निर्णायक? विरोधकांचं झालं पानीपत

IND vs AUS 1st Test : नाद करा, पण Yashasvi Jaiswal चा कुठं? ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी धुतले; गावस्कर, तेंडुलकर, कांबळी यांच्याशी बरोबरी

Latest Maharashtra News Updates : राज्याचा निकाल आधीच ठरला होता, नंतर निकालाचं चित्र बदललं; महायुतीच्या विजयानंतर संजय राऊतांचा आरोप

TRAI Regulations : मोठी खबर! १ जानेवारीपासून TRAI लागू करणार नवा नियम; कंपन्यांचा फायदा अन् ग्राहकांचा तोटा?

Maharashtra Assembly Election Result: पुण्यातील 'या' मतदारसंघात अनेक वर्षांची परंपरा कायम; जनतेचा कौल नव्या आमदाराकडेच

SCROLL FOR NEXT