Due To Corona, There Is No Event In Mangaon Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

ऐतिहासिक माणगावमध्ये कोरोनामुळे यंदाही कार्यक्रम नाही

सागर कुंभार

रुकडी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 21 व 22 मार्च, 1920 रोजी झालेल्या ऐतिहासिक पहिल्या बहीष्कृत वर्गाच्या माणगांव परिषदेस 101 वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्याचे वर्ष शताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने माणगांव (ता. हातकणंगले) येथे 22 मार्च 2020 रोजी भव्य असा शताब्दी वर्ष सोहळ्याचा प्रारंभ व स्मारकाच्या अनुषंगाने सुरूवात करण्याचे नियोजन होते.

या ऐतिहासिक स्मारकाचा 169 कोटींचा आराखडा तयार केला. यापैकी सुरूवातीच्या 2 कोटी 38 लाखांच्या लंडन हाऊस प्रतिकृती, ऐतिहासिक तक्‍क्‍या इमारत आणि हॉलोग्राफीक शो व स्वागत कमानीचे लोकार्पण लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत गतवर्षी करण्यात येणार होते. पण कोरानामुळे तो कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने रद्द केला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोणतेही कार्यक्रम यावर्षीही होणार नाहीत. दिवसभरात शाहू व आंबेडकरप्रेमी अभिवादन करण्यासाठी येत आहेत. 

नियोजित स्मारकाची संकल्पना 1985 मध्ये झाली. 25 जून 2010 रोजी आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष व संघटना यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर बबन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 25 हजार आंबेडकरी जनतेचा महामोर्चा काढून निवेदन दिले होते. स्मारकाला 2009 मध्ये शासन स्तरावर सुरूवात झाली. तत्कालीन मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधीमंडळातील अधिवेशनामध्ये 29 कोटींची तरतूद करीत असल्याबद्दल जाहीर केले. मात्र त्यावेळी जागा संपादनाचे काम झाले नसल्यामुळे ते स्मारक प्रलंबितच राहीले. 

2017-18 मध्ये तत्काळ नवीन आराखडा बनवून शासनास सादर करण्याचे निर्देश दिले. त्याप्रमाणे इतिहास संशोधक जयसिंग पवार, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, प्राचार्य हरीष भालेराव, प्रा. कृष्णा किरवले व अनिल कांबळे-माणगांवकर यांनी आराखडा समिती तयार केली. समितीने 169 कोटींचा आराखडा बनवून शासनास सादर केला. स्मारकासाठी माणगांव येथील बौध्द समाज बांधवांनी सुमारे साडे चार एकर जमीन दिली. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ती शासनास स्मारकाकरीता म्हणून संपादन केली आहे. 

पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून स्मारकाकरीता आग्रही रहावे
राज्याच्या अर्थसंकल्पात स्मारकासाठी भरीव तरतूद होईल अशी अपेक्षा होती. शाहू, फुले, आंबेडकरी जनतेचे स्वप्न साकार होईल असे वाटत होते. ते होण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय विधी मंडळ सदस्यांनी पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून या माणगांव परिषद स्मारकाकरीता आग्रही रहावे ही अपेक्षा आहे. 
- अनिल कांबळे- माणगांवकर, राष्ट्रीय स्मारकाचे कार्यकर्ते, माणगांव 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT