Electric Scooter 
कोल्हापूर

इलेक्ट्रीक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनधारकांना करात मिळणार 'सवलत'

अजित माद्याळे

यासंदर्भात शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार असून गृहनिर्माण संस्थांसाठीही पाच टक्के करात सूट देण्यात येणार आहे.

गडहिंग्लज : शासनाच्या इलेक्ट्रीक वाहन (electric vehicle) धोरणानुसार शहरामध्ये स्वत:च्या इलेक्ट्रीक वाहनाला आणि नागरिकांच्या इलेक्ट्रीक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारणार्‍या नागरिकाला वैयक्तिक मालमत्ता करात दोन टक्के सूट देण्याचा निर्णय आज येथील नगरपालिकेने घेतला आहे. यासंदर्भात शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार असून गृहनिर्माण संस्थांसाठीही पाच टक्के करात सूट देण्यात येणार आहे. यावेळी नगराध्यक्षा स्वाती कोरी अध्यक्षस्थानी होत्या.

स्वत:च्या इलेक्ट्रीक वाहनांना आणि इतर इलेक्ट्रीक वाहनधारकांना चार्जिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी चार्जिंग स्टेशन उभारल्यास त्यांना मालमत्ता करात दोन टक्के तर गृहनिर्माण संस्थांमध्ये सामायिक सुविधांतर्गत सदस्यांना ही सुविधा उपलब्ध केल्यास पाच टक्के सूट देण्याची शासनाचे आदेश आहेत. या सभेत सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान, अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना, दलित्तेतर वस्ती सुधार योजना अंतर्गत विविध विकास कामे घेण्याचाही निर्णय झाला.

'हेरिटेज' साठी सहा वास्तूंची निवड

जिल्हा हेरिटेज कॉन्झर्वेशन समितीच्या सुचनेनुसार गडहिंग्लज शहरातील इमारतींची वारसा यादी तयार केली आहे. त्यात ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्‍वभूमी असलेल्या तहसील कार्यालय व पोलिस ठाण्याची इमारत, जुनी न्यायालयीन वास्तू, बॅ. नाथ पै विद्यालय, एम. आर. हायस्कूलची दगडी इमारत, काळू मास्तर विद्यालय आणि श्री. महालक्ष्मी मंदिर सहा वास्तूंसह पालिकेच्या लोकशिक्षण व्याख्यानमालेची निवड करण्यात आली आहे. या वास्तूंची यादी मंजूरीसाठी नगररचना विभागाच्या सहायक संचालकांकडे पाठवण्याचा निर्णयही आजच्या सभेत घेण्यात आला. या वास्तूंच्या विकासासाठी पालिकेकडून बांधकाम परवान्याद्वारे पालिकेत जमा असलेल्या रक्कमेतून दोन टक्के विकासनिधी खर्च होणार आहे. दरम्यान, या सभेत नगरसेवक, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर सहभागी झाले होते.

निवडणूक खर्चाला मंजूरी

पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी होणार्‍या विविध खर्चास आजच्या सभेने मंजूरी दिली. स्टेशनरी, मंडप, बॅरेकेटींग, वाहनांचे भाडे, मतदार यादी छपाई, सीसीटीव्ही कॅमेरे, सर्व प्रकारचे नकाशे, कर्मचार्‍यांचा भत्ता, चहापान, अल्पोपहार, भोजन आदी अनुषंगीक कामांची विभागणी करुन नियोजन करणे आवश्यक असल्याने अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार खर्चास मान्यता देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT