अचानक घडलेल्या या प्रकाराने पुलावरून ये-जा करणाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. क्रांतीच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सोनाळी कांचनवाडी (ता. करवीर) : येथे वडिलांबरोबर तुळशी नदीत (Tulsi River) जनावरे धुवायला गेलेल्या तीन भावंडांचे अकरा वर्षांच्या क्रांती सागर कांबळे हिने मोठ्या धाडसाने प्राण वाचविले.
याबाबत अधिक माहिती अशी, क्रांतीचे वडील सागर कांबळे हे जनावरे घेऊन नदीवर गेले होते. त्यांच्याबरोबर त्यांच्या तीन मुली व लहान पुतण्याही अंघोळीसाठी नदीवर आला होता. सध्या तुळशी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे.
दरम्यान, सागर कांबळे हे नदीच्या पाण्यात जनावरे धुवत होते. त्याचवेळी क्रांती, आराध्या, माहेश्वरी व श्रवण कांबळे हे ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह जास्त होता, तेथे बसले होते. त्याचवेळी अचानक आराध्या पाय घसरून पाण्यात पडली. त्यानंतर लगेचच माहेश्वरी व श्रावण हेही पाण्यात पडले.
नदीकाठावर उभ्या असलेल्या क्रांतीच्या हा प्रकार लक्षात आल्यावर धाडसाने तिने टॉवेलच्या सहाय्याने तीन भावंडांना सुखरूप बाहेर काढले. या वेळी नदीच्या आजूबाजूला कोणीही नव्हते. अचानक घडलेल्या या प्रकाराने पुलावरून ये-जा करणाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. क्रांतीच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.