Engineer Body Found in Irani Khan Kolhapur esakal
कोल्हापूर

Irani Khan Kolhapur : मनासारखी नोकरी मिळत नाही म्हणून अभियंत्याची आत्महत्या? इराणी खणीत सापडला मृतदेह

वडिलांच्या निधनानंतर आईने कष्टाने त्याला शिकविले. त्याला मेकॅनिकल अभियंता केले.

सकाळ डिजिटल टीम

खासगी नोकरी करीत त्याने कुटुंबीयांना आर्थिक हातभार लावला; मात्र त्याला अपेक्षेप्रमाणे नोकरी पाहिजे होती. ती मिळत नसल्यामुळे तो निराश होता.

कोल्हापूर : बेपत्ता असलेल्या अभियंत्याचा (Engineer) मृतदेह काल (मंगळवार) रंकाळा परिसरातील इराणी खणीत (Irani Khan Kolhapur) सापडला. अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) जवानांनी मृतदेह बाहेर काढला. शिवम अनिल सावंत (वय २६, रा. जुनी मोरे कॉलनी, संभाजीनगर) असे त्याचे नाव आहे.

वडिलांच्या निधनानंतर आईने कष्टाने त्याला शिकविले. त्याला मेकॅनिकल अभियंता केले, मात्र मनासारखी नोकरी मिळत नाही म्हणून त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे. त्याच्या मागे आई, आजी, भाऊ, वहिनी, बहीण असा परिवार आहे. सोमवारपासून तो बेपत्ता असल्याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात (Rajwada Police Station) आहे.

पोलिसांनी सांगितले की, संभाजीनगर परिसरात शिवम हा कुटुंबीयांसमवेत राहत होता. वडिलांचे दहा वर्षांपूर्वी निधन झाल्यानंतर आईच त्याचे छत्र बनली. त्यानंतर शिवमने मेकॅनिकल अभियंता म्हणून पदवी घेतली. त्यानंतर खासगी नोकरी करीत त्याने कुटुंबीयांना आर्थिक हातभार लावला; मात्र त्याला अपेक्षेप्रमाणे नोकरी पाहिजे होती. ती मिळत नसल्यामुळे तो निराश होता. काही महिन्यांपासून तो दुसऱ्या नोकरीच्या शोधात होता.

सोमवारपासून तो घरातून कोणालाही न सांगता निघून गेला होता. त्याचा शोध सुरू होता. दरम्यान, काल सकाळी इराणी खणीत मृतदेह असल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस घटनास्थळी पोचले. तेथे त्यांना तरुणाचा मृतदेह तरंगताना दिसला. अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT