Devendra Fadnavis Hasan Mushrif esakal
कोल्हापूर

Kolhapur : मुश्रीफांनी इशारा देताच फडणवीसांची 'सुळकूड योजने'त एन्ट्री; वाद चिघळणार की पाणीप्रश्न सुटणार?

सकाळ डिजिटल टीम

इचलकरंजीकरांनी योजनेसाठी कागलमध्ये येण्याचं धाडस करू नये, असा इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला.

इचलकरंजी : सुळकूड (Sulkud Water Scheme) उद्भव असलेल्या दुधगंगा योजनेसंदर्भात बैठक घ्यावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संबंधितांना केली आहे. या संदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांनी त्यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली होती.

आमदार आवाडे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, इचलकरंजी शहराला सध्या आठवड्यातून दोन-तीन दिवसच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता अमृत दोन अभियानांतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुळकूड योजनेला शासकीय मान्यता दिली आहे.

सन २०११ च्या जनगणनेनुसार इचलकरंजी शहराची लोकसंख्या तीन लक्ष असून व्यवसाय आणि उदरनिर्वाहाच्या निमित्ताने शहराच्या परिसरातून येणाऱ्यां‍ची तरंगती लोकसंख्या अंदाजे एक लाख आहे. शहराचा वाढता विस्तार व पाण्याची गरज लक्षात घेता इचलकरंजी शहराला पिण्याच्या पाण्यासाठी कागल तालुक्यातील सुळकुड उद्भव दुधगंगा नदी येथून पाणीपुरवठा करण्यास मान्यता दिली आहे.

पण, या योजनेस शासनाची मान्यता मिळूनही स्थानिक राजकारणामुळे योजनेचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. या योजनेला कागल तालुक्यातील मंत्र्यांसह आजी-माजी लोकप्रतिनिधींनी विरोध करीत ही योजना होऊच देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. तर इचलकरंजीतील नागरिक ही योजना व्हावी, यासाठी आक्रमक होत आहेत.

इचलकरंजीसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या सुळकूड पाणी योजनेप्रश्‍नी आपण स्वत: तसेच उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत कागल तालुक्यातील प्रमुख हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, समरजीत घाटगे, संजय घाटगे यांच्यासह इचलकरंजीतील लोकप्रतिनिधी व संबंधितांची एकत्रित बैठक तत्काळ आयोजित करून इचलकरंजीचा पाणी प्रश्‍न मार्गी लावावा.

बैठकीकडे लक्ष

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जरी बैठक घेण्याची सूचना दिली असली तरी अद्याप तारीख व वेळ ठरलेली नाही. त्यामुळे ही बैठक कोठे व कधी होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या संदर्भात बैठक झाल्यास त्यामध्ये होणाऱ्या निर्णयाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

'शेतकऱ्यांमधून उद्रेक होईल'

इचलकरंजीवासीयांना (Ichalkaranji) सुळकूड (Sulkud Water Scheme) येथून पाणी दिल्यास काळम्मावाडी धरणाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमधून उद्रेक होईल. त्यामुळं इचलकरंजीकरांनी योजनेसाठी कागलमध्ये येण्याचं धाडस करू नये, असा इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather update: शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! राज्यात पुन्हा सक्रिय पावसाची शक्यता, पुणे-मुंबईत काय असेल परिस्थिती?

आजचे राशिभविष्य - 20 सप्टेंबर 2024

अग्रलेख : एकदाच काय ते...

Sakal Podcast : तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! ते राज्यात तिसरी आघाडी जाहीर

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

SCROLL FOR NEXT