Breaking News  Sakal
कोल्हापूर

लेकाच्या फीसाठी बँकेनं कर्ज नाकारलं; उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यात शेतकरी बापाची आत्महत्या

रोहित कणसे

कोल्हापूर : मुलाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी बँकेने शैक्षणिक कर्ज नाकारल्याने एका शेतकऱ्यांने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनेकदा बँकेकडे विनंती अर्ज करून देखील त्याची दखल घेतली गेली नाही. शेवटी नैराश्यातून या शेतकऱ्याने आपलं जीवन संपवलं. महादेव पाटील असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.

दरम्यान चंद्रकात पाटील हे सध्या राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आहेत, मात्र त्यांच्याच कोल्हापूर जिल्ह्यात हा प्रकार समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. साम टीव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

मिळालेल्या मागितीनुसार, कोल्हापूरातील पिसात्री गावातील शेतकरी महादेव पाटील यांनी आपल्या मुलाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न पाहिलं होतं. मात्र बँकेकडून कॉलेजची फी भरण्यासाठी त्यांना शैक्षणिक कर्ज मिळालं नाही. यातून आलेल्या नैराश्यामुळे शेतकरी बापाने गळफास लावून स्वतःचं जीवन संपवलं.

मुलगा बीएचएमएससाठी जयसिंगपूर येथील विद्यालयात प्रवेश घेतला होता. शेतकऱ्याने घर बांधल्यामुळे पैशांची अडचण असल्याने महादेव पाटील बँकेत शैक्षणिक कर्जाची मागणी केली. बँकेने पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये या कर्ज देतो, तोपर्यंत तुमच्या जवळ असलेले पैसे भरा असे सांगितले.

त्यानंतर शेतकऱ्याने दागीने गहान ठेवून इतर तजवीज करून पैसे भरले. यानंतर दुसऱ्या वर्षी फेब्रुवारी मध्ये जेव्हा ते बँकेत कर्जा मागण्यासाठी गेले तेव्हा मात्र बँकेने कर्ज देण्यास नकार दिला, असे मृत शेतकऱ्यांच्या नातेवाइकानी सांगितले.

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलाची फीस भरण्यासाठी वेळेत पैसे न मिळाल्याने शेतकऱ्याने आत्महत्या केली. यानंतर बँकेकडून जर शेतकऱ्यांना कर्ज नाकारण्यात आल्याने शेतकऱ्यांची मुलं शिकणार कशी असा प्रश्न विचारला जातो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT