Kolhapur Court esakal
कोल्हापूर

Kolhapur Crime : पोटच्या आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार; बापाला 20 वर्षे शिक्षा, हजार रुपये दंड

सकाळ डिजिटल टीम

कुटुंबीयांतील सर्व महिला शेजारील घरातील वाढदिवसासाठी गेल्यानंतर आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला होता.

कोल्हापूर : पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी बापास वीस वर्षे सक्तमजुरी आणि हजार रुपये दंड अशी शिक्षा न्यायालयात (Kolhapur Court) सुनावण्यात आली. शहराच्या एका भागात २०२० मध्ये झालेल्या घटनेचा गुन्हा लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात (Laxmipuri Police Station) नोंद आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी ही शिक्षा सुनावली.

नात्याला काळिमा फासणारी ही घटना २०२० मध्ये घडली होती. कुटुंबीयांतील सर्व महिला शेजारील घरातील वाढदिवसासाठी गेल्यानंतर आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला होता. यावर ‘माझी चूक झाली, मला एकदा माफ करा,’ अशी विनंती संशयिताने केली होती. मात्र, याची फिर्याद लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर तत्कालीन पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे व तत्कालीन उपनिरीक्षक सुनीता शेळके यांनी हा तपास केला. त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले.

सरकारी वकील मंजूषा पाटील यांनी न्यायालयात एकूण नऊ साक्षीदार तपासले. पीडिताचे कुटुंबीय, वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी झाल्या. सुनावणीत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने संशयितास बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा कलम चारप्रमाणे (पोक्सो) आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी पोलिस हेडकॉन्स्टेबल धोंडिराम शिंदे यांनी तपासात सहकार्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND Vs New Zealand Test: भारतीय संघाची घोषणा; बुमराहची मोठी झेप! उप कर्णधारपदाची माळ पडली गळ्यात

Video: सत्तेला धरा, हीच विचारधारा!; सयाजी शिंदेंचं जुनं रिल अन् मिम्स व्हायरल

Latest Marathi News Updates: दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या सविस्तर

Sayaji Shinde NCP: "मी अनेक नेत्यांच्या भूमिका केल्या पण..."; राष्ट्रवादीत प्रवेशानंतर सयाजी शिंदेंनी मांडली भूमिका

IND vs NZ: भारताविरूद्ध घेणार आक्रमक पवित्रा; न्यूझीलंडच्या कर्णधाराने सांगितली रणनीती

SCROLL FOR NEXT