Financial dilemma of hoteliers in Amba 
कोल्हापूर

पर्यटकांअभावी आंब्यात हॉटेल्स व्यावसायिकांची आर्थिक कोंडी

दिग्विजय कुंभार

आंबा : नियमांच्या अधीन राहून हॉटेल्स आणि रिसॉर्टस सुरू करण्यास दिलेली परवानगी दिलासा देणारी असली तरी पर्यटकांअभावी आंब्यातील हॉटेल्स व रिसॉर्टस व्यावसायिकांची वाट बिकटच राहणार आहे. 

प्रतिमहाबळेश्वर म्हणून उदयास आलेले आंबा गिरीस्थानात बाराही महिने निसर्ग फुललेला असल्याने पुण्या-मुंबईतून पर्यटकांची भाऊगर्दी होते. साडेतीन महिन्यांपासून हॉटेल्स आणि रिसॉर्टस बंद आहेत. परिणामी व्यावसायिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. पर्यटन आणि जिल्हा सीमाबंदीमुळे पर्यटक येण्यास अडचणी आहेत. त्याचा फटका हॉटेल्स व रिसॉर्टस मालकांना बसला आहे. जंगल सफारीच्या गाड्याही बंद राहिल्याने चालक-मालकांची कोंडी झाली आहे. येथील नऊ रिसॉर्टस कोरोनाच्या अलगीकरण कक्षासाठी ठेवल्याने संबंधित रिसॉर्टस मालक काळजीत आहेत. गिऱ्हाईकांअभावी बाजारपेठेत आर्थिक उलाढाल होत नाही. 

नियमांच्या चौकटीत राहून हॉटेल्स व रिसॉर्टस उघडली जाणार असली तरी परजिल्ह्यातून पर्यटक येणार नाहीत. पर्यायाने हॉटेल्स व रिसॉर्टस मालकांना पुढील काही दिवस जिल्ह्यातील पर्यटकांवरच कसेबसे भागवावे लागणार आहे. 

साडेतीन महिन्यांपासून बंद असलेल्या पर्यटनामुळे आर्थिक गणित बिघडले आहे. नियमांस बांधील राहून हॉटेल व रिसॉर्ट उघडण्यास काही अंशी परवानगी दिली आहे. यातून किमान कामगार पगार, वीज बिले व मेंटेनन्स तरी भागवण्यास मदत होईल अशी आशा आहे. 
- संतोष बागम, उपाध्यक्ष, आंबा-मानोली टुरीझम असोसिएशन 

पर्यटनबंदीमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत आहे. पर्यटन पूर्ण क्षमतेने सुरू राहिल्यास हॉटेल्स व रिसॉर्टसना उभारी येईल. शासनाने वीजबिले व महसुली करात शंभर टक्के सूट द्यावी. 
- अमित बेर्डे, साई कुटी हॉटेलमालक आंबा 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

Pune Assembly Eletion 2024 : मतदान केंद्रांच्या दोनशे मीटर परिसरात वाहने लावण्यास मनाई

SCROLL FOR NEXT