Dhanaji Chudamunge sakal
कोल्हापूर

कुरुंदवाडमध्ये १ मे ला 'पूर परिषद'; धनाजी चुडमुंगे

धनाजी चुडमुंगे; भरावांच्या पुलाना विरोध

सकाळ वृत्तसेवा

जयसिंगपूर : केवळ अलमट्टी धरणाला धोका पोहोचू नये म्हणून कर्नाटक सरकार नदी मार्गावर पुलांची निर्मिती करत आहे. या पुलांच्या भरावामुळे महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे ज्या पुलाला उंच भराव आहेत अशा ठिकाणी कमानी बांधाव्यात त्याशिवाय नवीन पुल बांधू देणार नाही. तसेच महापुरावर उपाययोजना शोधाव्यात यासाठी आंदोलन अंकूश १ मे रोजी कुरुंदवाड येथील कृष्णा-पंचगंगा संगम घाटावर 'पूर परिषद' घेणार असल्याची माहिती, अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी सोमवारी पत्रकार परीषदेत दिली.

ते म्हणाले, कर्नाटक सरकारच्या धोरणामुळे महापुरामुळे मोठी हानी होत आहे. कृष्णा नदीवरील अंकली-मांजरीच्या पुलाला तब्बल दोन्ही बाजुला तीन किलोमीटरचा भराव आहे. शिवाय हिप्परगीच्या बंधार्‍यामुळे महापुर ओसरत नाही असे असताना महाराष्ट्र सरकारने कोणतीही भुमिका जाहिर केली नाही. त्यामुळे केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शनाचे पालन करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने समिती स्थापन करावी. याबाबत आम्ही न्यायालयात दाद मागणार आहे.

२००५, २०१९, २०२१ मध्ये आलेल्या महापुराने पश्चिम महाराष्ट्राची प्रंचड हानी झाली असे असताना सरकारने आद्याप कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या नाही. मग सरकारच्या या चुकीच्या धोरणामुळे प्रत्येक वर्षी महापुरामुळे आम्ही उध्दस्त होत असल्याचे सरकारला दिसत नाही का सवाल उपस्थित करत पुलाचे भराव काढुन कमीन पुल बांधल्याशिवाय आम्ही नवीन पुल बांधू देणार नाही असे त्यांनी सांगितले. यावेळी दिपक पाटील, भुषण गंगावणे, संभाजी जाधव, विनोदकुमार व्हराटे, अमोल माने, मंगेश घाटगे, राजेंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT