amal mahadik satej patil  sakal
कोल्हापूर

Kolhapur News : सतेज पाटील, महाडिकांनी माफी मागावी; आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची मागणी

संघटनांकडून निषेध : अमल महाडिक व आमदार सतेज पाटील यांचा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी निषेध केला

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बिंदू चौकात आयोजित कार्यक्रमात गोंधळ घालून डॉ. आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्या माजी आमदार अमल महाडिक व आमदार सतेज पाटील यांचा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी निषेध केला.

या दोघांनीही बिंदू चौकात येऊन माफी मागावी, असे आवाहन चळवळीतील कार्यकर्ते डॉ. अनिल माने यांनी केले आहे. बिंदू चौक हा परिवर्तनवादी चौक म्हणून ओळखला जातो. याच परिसरात महात्मा जोतिबा फुले व डॉ. आंबेडकर यांचे पुतळे आहेत.

डॉ. आंबेडकर यांचा या परिसरातील पुतळा हा जगातील पहिला आहे, पण राजाराम कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी जयंतीचा कार्यक्रम सुरू असताना घातलेला गोंधळ निषेधार्ह आहे. त्यांनी यासाठी बिंदू चौकच का निवडला? आव्हान, प्रति- आव्हानासाठी जयंतीचा दिवस का निवडला, असा सवालही या पत्रकात उपस्थित करण्यात आला आहे.

आंबेडकरी जनतेचे ऊर्जास्थळ, अस्‍मिता केंद्र असलेल्या बिंदू चौकाला राजकीय आखाडा बनवणाऱ्या अपप्रवत्तींचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले गट) जाहीर निषेध केला आहे. राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, या स्वप्नधुंदीत असणाऱ्या व स्वतःला पुरोगामी विचारांचे वारसदार म्हणून घेणाऱ्या, नेत्यांनी एकमेकाला आव्हान देण्याचा बिंदू चौकात केलेला प्रकार निषेधार्ह असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.

आंबेडकरी जनतेच्या भावनेशी खेळ करणाऱ्यांना सामाजिक, राजकीय जीवनातून हद्दपार करण्याचे सामर्थ्य आमच्या समाजात आहे, याचेही भान ठेवायला हवे, असे या पत्रकात म्हटले आहे. पत्रकावर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, सचिव प्रा. शहाजी कांबळे यांच्या सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shahajibapu Patil: काय झाडी काय डोंगर... फेम शहाजीबापू पाटील यांचा पराभव करणा-या युवा आमदाराने केली अनोखी घोषणा

Sharad Pawar : राज्यामध्ये लागलेला निकाल अनपेक्षित आहे

Narayan Rane: त्यांनी आता महाराष्ट्रात तोंड दाखवू नये; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

IPL 2025 Auction Live: अश्विनची १० वर्षांनंतर CSK संघात घरवापसी! तब्बल इतके कोटी मोजत घेतलं संघात

Latest Maharashtra News Updates : कोकण कधीच ठाकरेंचं नव्हतं- निलेश राणे

SCROLL FOR NEXT