Ajit Pawar KP Patil esakal
कोल्हापूर

Ajit Pawar : पश्चिम महाराष्ट्रात अजितदादांना मोठा धक्का? 'हा' माजी आमदार महाविकास आघाडीत जाण्याची शक्यता!

के. पी. पाटील महाविकास आघाडीत जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर ए. वाय. पाटील हे अजित पवार गटात गेले. मात्र, बिद्री कारखान्यात पॅनेल उभे केल्याने ते अजित पवार गटापासून लांब गेले.

कोल्हापूर : बिद्री कारखान्याचे (Bidri Sugar Factory) अध्यक्ष आणि माजी आमदार के. पी. पाटील (K. P. Patil) हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात आहेत. मात्र, शक्तिपीठ महामार्गाच्या (Shaktipeeth Highway) विरोधी मोर्चात ते सहभागी झाले होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रकाश आबिटकर यांच्यावरही टीका केली.

खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांनी राधानगरीत आभार यात्रा काढली होती. त्यातही महाराजांच्या स्वागतासाठी ते उपस्थित होते. यामुळे के. पी. पाटील महाविकास आघाडीत जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू असून महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या जागा वाटपावर नेत्यांचे पक्ष ठरणार आहेत. मात्र, माजी आमदार के. पी. पाटील यांची महाविकास आघाडीबरोबर सलगी वाढत आहे.

शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी नुकताच विराट मोर्चा निघाला होता. यामध्ये के. पी. पाटील सहभागी झाले होते. एवढेच नव्हे तर त्यांनी भाषणात महायुतीच्या सरकारवर सडकून टीका केली. शक्तिपीठ महामार्गाचे स्वागत करणारे फलक आमदारांनी लावले. जणू हा मार्ग त्यांनीच आणला.

शेतकऱ्यांचा विरोध दिसू लागल्यावर फलक उतरवले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर हा कोल्हापूरचा विकास मार्ग असून आमदारांच्या प्रयत्नाने महामार्ग आणला असल्याचे सांगितले. एकीकडे हे विरोध करतात आणि दुसरीकडे मार्ग बदला म्हणून मुख्यमंत्र्यांना निवेदन देतात. यांचा शक्तिपीठ महामार्गाला छुपा पाठिंबाच आहे.’ अशी टीका के. पी. पाटील यांनी केली होती.

राधानगरी परिसरात खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची आभार यात्रा सुरू आहे. महाराजांच्या स्वागतालाही के. पी. पाटील उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत के. पी. पाटील हे महायुतीच्या बाजूने होते. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा प्रचार केला. पण, त्यांच्या राधानगरी-भुदरगड मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना ६२ हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे के. पी. पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणाचा प्रचार केला याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांतील घटना के. पी. पाटील महाविकास आघाडीकडे जाणार का, असे चित्र निर्माण करणाऱ्या आहेत.

कोणाच्या वाट्याला जागा?

राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघातील जागा महायुतीमध्ये शिवसेनेकडे आहे. त्यामुळे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांची दावेदारी प्रबळ आहे. महाविकास आघाडीत ही जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळणार की राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळणार हे अद्याप निश्चित नाही. त्यामुळे राज्य पातळीवरच्या जागा वाटपानंतरच स्थानिक नेत्यांचे पक्ष ठरणार आहेत.

मेव्हणे-पाहुणे आमने सामने

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर ए. वाय. पाटील हे अजित पवार गटात गेले. मात्र, बिद्री कारखान्यात पॅनेल उभे केल्याने ते अजित पवार गटापासून लांब गेले. लोकसभेत त्यांनी उघडपणे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचा प्रचार केला. त्यामुळे ए. वाय. पाटील आणि के. पी. पाटील दोघेही महाविकास आघाडीच्या जवळ असल्याचे दिसते. विधानसभेचे तिकीट मिळवण्यासाठी पुन्हा मेव्हणे-पाहुणे आमने- सामने दिसण्‍याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT