Rajesh Kshirsagar vs Ravikiran Ingawale esakal
कोल्हापूर

Kolhapur : कसला माज आलाय, मी तर त्याला ठोकून काढलं असतं; राजेश क्षीरसागरांचा इंगवलेंना थेट इशारा

क्षीरसागरांनी महिलेच्या पदराआडून राजकारण करू नये : रविकिरण इंगवले

सकाळ डिजिटल टीम

क्षीरसागरांनी महिलेच्या पदराआडून राजकारण करू नये : रविकिरण इंगवले

Kolhapur News : महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) मोठा गदारोळ पहायला मिळत आहे. कोल्हापुरातही (Kolhapur) शिंदे विरुध्द ठाकरे असाच काहीसा सामना रंगताना दिसत आहे. कोल्हापुरात शिवसेना (Shiv Sena) शहरप्रमुख रविकिरण इंगवले (Ravikiran Ingawale) आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांच्यातील वाद आणखी चिघळलाय.

शहरप्रमुख इंगवले यांच्यासह 40 शिवसैनिकांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर क्षीरसागर यांनी मी त्या ठिकाणी असतो, तर ठोकून काढलं असतं, अशी प्रतिक्रिया दिलीय. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे शिवसैनिक आहोत. महिलांचा अवमान सहन करणार नाही. मी जर त्या ठिकाणी अधिकारी म्हणून असतो तर ठोकून काढलं असतं, कसला माज आलाय ते बघायला पाहिजे अशा शब्दात राजेश क्षीरसागर यांनी ठाकरे गटाचे शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांना लक्ष्य केलं. महिला व्यासपीठावर असताना अश्लील हावभाव करणं हे ज्यानं कोणी केलं असेल त्याला शोभत नाही, असंही ते म्हणाले.

बूथवर बसलेल्या महिलांकडेपाहून घाणेरडे हातवारे

महिला आघाडी सदस्यांनी ही तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी पाहणी करूनच गुन्हा दाखल केला असेल. गुन्हा खोटा नसून यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप नसल्याचा दावाही त्यांनी केला. सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी क्षीरसागर याच्या बूथवर बसलेल्या महिलांकडेपाहून घाणेरडे हातवारे केल्याचा आणि शब्द वापरल्याचा आरोप यावेळी क्षीरसागर यांनी इंगवलेंवर केलाय.

इंगवलेंचं राजेश क्षीरसागरांना ओपन चॅलेंज

राजेश क्षीरसागर यांनी मी गणपती मिरवणुकीत विनयभंग केल्याचं सिध्द केल्यास कोल्हापूरचं काय देश सोडून जातो. परंतु, त्यांनी पुरूषार्थ असेल तर स्वत: तक्रार करायला हवी होती. महिलेच्या पदराआडून राजकारण करू नये, असं आव्हान शिवसेनेचे शहरप्रमुख रवि इंगवले यांनी पत्रकार परिषदेत केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: पवारांची साथ मिळूनही हर्षवर्धन पाटलांसाठी निवडणूक सोप्पी नाही? घरातूनच बसला धक्का

Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

Sakal Podcast: अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार?

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT