Raju Shetti Swabhimani Shetkari Sanghatana esakal
कोल्हापूर

Raju Shetti : आता साखर कारखानदारांना वठणीवर आणल्याशिवाय गप्प बसणार नाही; राजू शेट्टींचा गर्भित इशारा

कारखानदारांना येत्या निवडणुकीत शेतकऱ्यांचे पैसे वापरायचे आहेत.

सकाळ डिजिटल टीम

‘न्याय मागून मिळत नसेल तर तो हिसकावून घ्यावा लागेल.‌ कारखानदारांनी अजूनही शहाणे व्हावे नाहीतर महागात पडेल.’

चंदगड : ‘काबाडकष्ट करून शेतकरी ऊस पिकवतो. त्याच्या घामावर ऐशोआराम भोगणाऱ्या कारखानदारांना (Sugar Factory) वठणीवर आणल्याशिवाय गप्प बसणार नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळवून देणारच,’ असा विश्वास माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी व्यक्त केला.

मजरे कार्वे (ता. चंदगड) येथे आज शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. सरपंच शिवाजी तुपारे अध्यक्षस्थानी होते. शेट्टी म्हणाले, ‘साखर उद्योग कोणत्याही अडचणीत नाही. कारखानदारांना येत्या निवडणुकीत शेतकऱ्यांचे पैसे वापरायचे आहेत. कारखानदारी परवडत नाही ही केवळ आवई आहे. तसा त्यांनी ना हरकत दाखला द्यावा. आम्ही कारखाना सुस्थितीत चालवून योग्य दर देऊ.’

प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील म्हणाले, ‘न्याय मागून मिळत नसेल तर तो हिसकावून घ्यावा लागेल.‌ कारखानदारांनी अजूनही शहाणे व्हावे नाहीतर महागात पडेल.’ राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यानावर म्हणाले, ‘शेतकरी आपल्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरले तर कायदा व सुव्यवस्था बिघडते, असे म्हणून कारखानदारांना संरक्षण पुरवणाऱ्या सरकारची नियत चांगली नाही.’

जि.प.चे माजी सभापती भरमाण्णा गावडे यांनी संघटनेसाठी पाच हजारांचा धनादेश माजी खासदार शेट्टी यांच्याकडे दिला. यावेळी जगन्नाथ हुलजी, देवाप्पा बोकडे, पांडुरंग बेनके, कृष्णा पाटील, सुरेश कुट्रे, बाळू पेडणेकर उपस्थित होते. प्रा. दीपक पाटील यांनी सूत्रसंचलन केले.‌

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT