Vedganga River on Anur-Bastawade Road Murgud Police esakal
कोल्हापूर

Vedganga River : हृदयद्रावक! वेदगंगेत मायलेकरासह चौघांचा बुडून दुर्दैवी अंत; तिघांचे मृतदेह सापडले, हर्षच्या मृतदेहाचा शोध सुरू

सकाळ डिजिटल टीम

आरोही ही काठावर उभी होती. तिच्या डोळ्यासमोरच वडील, आत्या व आतेभाऊ यांचा अंत झाला.

म्हाकवे : आणूर-बस्तवडे दरम्यान वेदगंगा नदीपात्रात (Vedganga River) बुडणाऱ्या शाळकरी मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात चौघे बुडाले. बस्तवडे (ता. कागल) बंधाऱ्यात ही घटना काल (शुक्रवार) दुपारी घडली. जितेंद्र विलास लोकरे (वय ३६, रा. मुरगूड, ता. कागल), रेश्मा दिलीप यळमल्ले (३४), हर्ष दिलीप यळमल्ले (वय १७, दोघेही रा. अथणी, कर्नाटक) व सविता अमर कांबळे (२७, रा. रुकडी, ता. हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत.

यातील तिघांचे मृतदेह सापडले असून, हर्षचा मृतदेह शोधण्याचे काम दुपारपासून सुरू केले होते. रात्री नऊ वाजेपर्यंत त्याचा मृतदेह सापडला नव्हता. रात्र झाल्याने आज सकाळी मृतदेह शोधण्याचे काम बचाव पथक (Rescue Team) करणार आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मृतांत मुरगूडच्या जितेंद्र लोकरे, त्यांची बहीण, बहिणीचा मुलगा आणि मामाच्या मुलीचा समावेश आहे. आणूर गावच्या यात्रेसाठी हे सर्वजण आले होते. काल दुपारच्या सुमारास ते गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या वेदगंगा नदीकडे गेले होते. काळम्मावाडी धरणाचे (Kalammawadi Dam) पाणी सोडल्याने वेदगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे व पाण्याला वेग होता. यावेळी ते कपडे धुण्यासाठी, तसेच अंघोळीसाठी नदीत उतरले. हर्ष हा खोल पाण्यात बुडताना आरडाओरड करत होता.

शेजारी असणारा मामा जितेंद्र पाण्यात उतरला आणि त्याच्या पाठोपाठ रेश्मा, साधना व सविताही उतरल्या. मात्र, पाण्याचा प्रवाह आणि भीतीपोटी एकमेकांना घट्ट मिठी मारल्याने सारे नदीत बुडाले. नदीच्या काठावर जितेंद्र लोकरे यांच्या १२ वर्षांच्या आरोही या मुलीने त्यांना पाण्यात बुडताना पाहिले.

तिने जोरात आरडाओरडा केल्यावर नदीकाठावर मासे पकडण्यासाठी आलेल्या बस्तवडे येथील अवधूत वांगळे यांनी गावातीलच प्रमोद पाटील याला बोलावून प्रसंगावधानता राखत नदीत उड्या घेतल्या. साधना लोकरे यांना वाचविण्यात त्यांना यश आले; तर तिघांचे मृतदेह त्यांनी नदीकाठावर आणले. हर्ष याला शोधण्याचे काम रेस्क्यू पथकाने दुपारपासून सुरू केले. मात्र, रात्री नऊ वाजेपर्यंत तो सापडला नव्हता. रात्र झाल्याने शोध कार्य थांबवले. आज सकाळी मृतदेह शोधण्याचे काम रेस्क्यू पथक करणार आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, तहसीलदार अमरदीप वाकडे, मुरगूडचे सहायक पोलिस (Murgud Police) निरीक्षक शिवाजी करे, तसेच कागलचे पोलिस अधिकारी, ग्रामीण रुग्णालयाच्या शववाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. मृतांचा पंचनामा करून मृतदेहांवर कागल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. माजी आमदार संजय घाटगे, आणूरचे सरपंच काकासाहेब सावडकर, पोलिसपाटील स्वाती कांबळे, बस्तवडेचे जयश्री साताप्पा कांबळे यांनी मदत कार्यात सहभाग घेतला.

आरोही समोरच वडिलांसह नातेवाइकांचा अंत

आरोही ही काठावर उभी होती. तिच्या डोळ्यासमोरच वडील, आत्या व आतेभाऊ यांचा अंत झाला. तिने प्रसंगावधान राखत आपले चुलते मारुती लोकरे यांना फोन करून घटनेची माहिती दिली.

मुश्रीफ यांनी परदेशातून घेतली दखल

आणूर येथे घडलेल्या या दुर्घटनेची माहिती कार्यकर्त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिली. परदेश दौऱ्यावर स्पेनमध्ये असलेल्या मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे, तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्याशी संपर्क साधला. स्थानिकांनी शोधाशोध करूनही लहान मुलगा हर्ष येळमल्ले याचा मृतदेह मिळत नसल्यामुळे त्याच्या शोध कार्यासाठी तातडीने आपत्ती व्यवस्थापनाच्या रेस्क्यू टीम नदीकडे पाठवण्याच्या सूचना मुश्रीफ यांनी केल्या. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून या सर्व मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे व तहसीलदार अमरदीप वाकडे यांना त्यांनी दिल्या.

आणूर-बस्तवडे दरम्यान वेदगंगा नदीपात्रात घडलेली घटना दुःखदायी आहे. लोकरे परिवारावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. प्रशासकीय पातळीवर आवश्यक ती सर्व मदत पुरवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

- संजय मंडलिक, खासदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT