Fraud Sakal
कोल्हापूर

Fraud News : बनावट ठेव पावत्यांद्वारे २२ लाखांची फसवणूक ; वकिलासह तिघांविरोधात गुन्हा

सरकारकडून आणि परदेशी लोकांकडून देखील मदत

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ठेवीच्या बनावट पावत्या देऊन तब्बल २२ लाख ३७ हजार २०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आज येथील तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. निवारा ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा अजित भोसले-जोशी (रा. सिल्व्हर आर्च अपार्टमेंट, राजारामपुरी तिसरी गल्ली, कार्यालय - हॉटेल त्रिवेणी मागे, निलकमल अपार्टमेंट तिसरा मजला शाहूपुरी), राहुल रमेश भोसले (रा. पूजा प्रिया पार्क, उचगाव), ॲड. भरत गाठ (रा. यड्राव रस्ता इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत.

तिघांनी नागाळा पार्क येथील अभियंता सचिन देसाई यांच्यासह ४३२ हून अधिकांची फसवणूक केल्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली. पोलिसांनी सांगितले, की देसाई यांनी पूजा भोसले, ॲड. भरत गाठ व राहुल भोसले यांच्याविरोधात पोलिस अधीक्षकाकंडे तक्रार केली. त्यानुसार शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी (पीएफ) भविष्य निर्वाह निधी सल्लागार राहुल भोसले यांच्यातर्फे भरतात.

त्यामुळे त्यांच्याशी ओळख होती. ते २५ मे २०२२ ला देसाई यांच्या कार्यालयात येऊन पुण्याचा निवारा हा पुण्यातील जुना ट्रस्ट आहे. त्याद्वारे गरजूंना मदत दिली जाते. सरकारकडून आणि परदेशी लोकांकडून देखील मदत येते. ट्रस्टचे रिटर्न भरण्याचे काम मी करतो, असे भोसलेने सांगितले. ट्रस्ट एफडी (मुदत बंद ठेव) घेतो. त्यासाठी साडेचार हजार जमा करा. पैकी तीन हजार ९०० ट्रस्टला जमा होतील. ६०० रुपये कागदपत्र खर्चासाठी मला द्यावे लागतील, असे भोसलेने देसाईंना सांगितले.

त्यामुळे देसाईंनी कुटुंबीयांतील १२ व्यक्तींचे साडेचार हजार प्रमाणे ५४ हजार रुपये भोसले याला ‘गुगल पे’द्वारे दिले. यावेळी तुमच्या ओळखीच्या व्यक्तींना ‘एफडी’ करायची असल्यास सांगा, असे सांगितले. त्यावर विश्‍वास ठेवून सुमारे १६२ जणांनी ठिकठिकाणी भेटून गुंतवणूक केली. त्यानंतर ‘एफडी’ करार करण्यासाठी त्यांनी टाळाटाळ केली व पैसे परत केले गेले नाहीत.

पासबुक, एफडीच्या पावत्याही खोट्या

पूजा भोसले हिने एका बँकेचे धनादेश दिले; मात्र तेही वटले नाहीत. त्यानंतर एफडीच्या पावत्या ज्या बॅंकेच्या शाखेतील दिल्या होत्या. तेथे जाऊन चौकशी केली; तेव्हा या पावत्या खोट्या असल्याचे बॅंकेतून सांगण्यात आले. त्यामुळे फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर फिर्यादी नोंद झाली. तिघांनी सुमारे १६२ जणांची २२ लाख ३७ हजार २०० रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा पोलिसांनी नोंद केला आहे.

पूजा भोसले हिने ट्रस्टच्या नावे बॅंकेत मोठ्या रकमा असलेली खोटी पासबुके दाखविली. ट्रस्टच्या माध्यमातून गरजूंना २५ लाख रुपये एफडी देण्यात येणार आहे. प्रत्येकाला २५ लाखांची एफडी रिसीट मिळणार, असे सांगून विश्‍वास संपादन केला असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: पुणे-बंगळूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

Mumbai Voting: मतदानाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो आज मध्यरात्रीपर्यंत धावणार

Supriya Sule: ऑडिओ क्लिप प्रकरण; ते सांगतील त्या ठिकाणी येऊन उत्तर देण्याची माझी तयारी, सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं

Beed News : ‘शिक्षण फुकट असतं, तर माझं लेकरू गेलं नसतं’

Gold Price: अचानक सोनं झालं स्वस्त... पण लवकरच भाव 1 लाखांच्या पुढे जाणार; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT