Ajit Pawar Hasan Mushrif esakal
कोल्हापूर

गडहिंग्लजमध्ये जनता दलाला मोठा हादरा; 'हे' बडे नेते अजितदादा, मुश्रीफांच्या उपस्थितीत करणार राष्ट्रवादीत प्रवेश

सकाळ डिजिटल टीम

स्थानिक पातळीवर इतर राजकीय पक्षांमध्ये कितीही उलथापालथ झाली तरी जनता दलातील एकजूट मात्र प्रत्येकवेळी जमेची बाजू ठरली आहे.

गडहिंग्लज : येथील जनता दलाचे (JDS) माजी नगराध्यक्ष बसवराज खणगावे, माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र भद्रापूर व उदय पाटील या तिघांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) प्रवेश निश्चित झाला आहे. यामुळे शहरातील जनता दलाला मोठा हादरा बसला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये आज (ता. १०) हा प्रवेश होणार असल्याचेही सांगण्यात आले.

दरम्यान, शहरातील विनोद बिलावर, अॅड. सतीश इटी यांच्यासह करंबळीचे भाजप सरपंच अनुप पाटील यांचाही प्रवेश असल्याचे श्री. खणगावे यांनी सांगितले. गेल्या वेळच्या सभागृहात स्वाती कोरी यांच्या नेतृत्वाखालील जनता दल पालिकेत सत्तेवर होते. सभागृहाची मुदत संपण्यापूर्वीपासून या पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू होती. अनेक वेळा त्यात दुरुस्तीचा प्रयत्नही झाला. परंतु त्यात यश आले नाही.

सभागृहाची मुदत संपल्यानंतरही दोन वर्षाच्या कालावधीत खणगावे मनापासून पक्षात कार्यरत नव्हते. दरम्यान, या कालावधीत खणगावे यांच्यासह पाटील यांचीही राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याशी जवळीकता वाढत होती. गोडसाखर निवडणुकीत उदय पाटील यांनी तर उघडपणे मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचा प्रचार केला होता. मित्रत्वाच्या नात्याने भद्रापूर यांची खासदार संजय मंडलिक यांच्याशी जवळीकता पूर्वीपासूनच आहे.

सहा महिन्यांपासून या तिघांचाही राष्ट्रवादी प्रवेश होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. श्री. मुश्रीफ यांचा फोन येताच मंगळवारी (ता. ९) सायंकाळी मुंबईकडे रवाना झाल्याचे श्री. भद्रापूर यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करणार असल्याचेही ते म्हणाले. स्थानिक पातळीवर इतर राजकीय पक्षांमध्ये कितीही उलथापालथ झाली तरी जनता दलातील एकजूट मात्र प्रत्येकवेळी जमेची बाजू ठरली आहे.

याच एकजुटीच्या बळावर दिवंगत श्रीपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील जनता दलाने अनेक वर्षे पालिकेवर झेंडा फडकविला आहे. आता सलग तीन ते पाचवेळा नगरसेवकपदी निवडून येणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांच्याच या निर्णयाने जनता दलातील एकजुटीला तडा गेला असून पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

राज्यात जनता दलाची सत्ता अगर कोणीही गॉडफादर नसल्याने शहरासाठी विकास निधी आणण्यात मर्यादा येत होत्या. पक्षातील कोणावरही आमची नाराजी नसून केवळ शहर विकासाला गती देण्यासाठीच राष्ट्रवादीत प्रवेश करीत आहोत.

-बसवराज खणगावे, माजी नगराध्यक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Amit Thackeray: अमित ठाकरेंसाठी सुरक्षित मतदारसंघ शोधला; पण मुंबईतला नाही तर...

Jarange Health Update: उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांनी केल्या कडक शब्दांत सूचना

Latest Marathi News Updates : नाशिकच्या सिन्नर तालुक्यात तीन शाळकरी मुलांच्या हत्येचा प्रयत्न; एकजण ताब्यात

IND vs BAN: अ‍ॅक्शन रिप्ले! Rohit Sharma दुसऱ्या डावातही फसला; एकाच पद्धतीने पुन्हा OUT झाला, जैस्वालही गंडला

Share Market Closing: आठवड्याच्या शेवटी शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्सने 1400 अंकांनी वाढला, निफ्टी 25,800च्या वर

SCROLL FOR NEXT