Gadhinglaj Panchayat Samiti Scam esakal
कोल्हापूर

Gadhinglaj Police : गडहिंग्लज पंचायत समितीत 23 लाखांचा अपहार; वरिष्ठ सहायक दयानंद पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल

Gadhinglaj Panchayat Samiti Scam Case : याप्रकरणी पाटीलला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यापूर्वीच निलंबित केले असून, शाहूवाडी पंचायत समितीकडे त्यांची नेमणूक केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

पदाचा गैरवापर करीत पाटील यांनी जाणीवपूर्वक व पद्धतशीर नियोजनाने शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

गडहिंग्लज : येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील २३ लाख ६७ हजार ९७ रुपयांच्या अपहारप्रकरणी वरिष्ठ सहायक दयानंद राजाराम पाटील (Dayanand Patil) याच्याविरुद्ध गडहिंग्लज पोलिसांत (Gadhinglaj Police) अपहार करून शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला. प्रभारी गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हलबागोळ यांनी याबाबतची फिर्याद दिली.

दरम्यान, याप्रकरणी पाटीलला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यापूर्वीच निलंबित केले असून, शाहूवाडी पंचायत समितीकडे त्यांची नेमणूक केली आहे. तसेच द्विसदस्यीय समितीद्वारे या प्रकरणाची सखोल चौकशीही पूर्ण झाली असून, त्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. आता त्यांच्याच आदेशाने पाटील यांच्याविरुद्ध हलबागोळ यांनी तक्रार दिली.

पाटील पंचायत समिती शिक्षण विभागात २०१९ ते जुलै २०२४ या कालावधीत वरिष्ठ सहायक पदावर असताना कार्यालयीन अास्थापनेतील वर्ग-३ व ४ च्या कर्मचाऱ्यांना पंचायत राज सेवार्थ प्रणालीमधून दरमहाचे वेतन व भत्ते जमा करण्याचे काम करीत होते. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य लेखा अधिकारी यांच्या २० सप्टेंबरच्या तपासणी अहवालात अपहार झालेल्‍या रकमांचा गोषवारा तक्त्यामध्ये पाटील यांना देय नसलेली व बेहिशोबी २१ लाख ७९ हजार १३ रुपये त्यांनी सेवार्थ प्रणालीच्या माध्यमातून स्वतःच्या बॅंक खात्यावर घेऊन अपहार केल्याचे स्पष्ट केले आहे.

तसेच कार्यालयातील पाच कर्मचाऱ्यांना रकमेचे अतिप्रदान केले आहे. ही रक्कम १ लाख ८८ हजार ८४ रुपये इतकी आहे. ही रक्कम सर्व संबंधितांच्या खात्यात जमा केली असून, अशा एकूण २३ लाख ६७ हजार ९७ रुपयांचा अपहार झाल्याचे सिद्ध झाले आहे. पदाचा गैरवापर करीत पाटील यांनी जाणीवपूर्वक व पद्धतशीर नियोजनाने शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबात पोलिस उपनिरीक्षक घाटगे तपास करीत आहेत.

३० सप्टेंबरला भरली रक्कम

दरम्यान, पाच कर्मचाऱ्यांना अतिप्रदान केलेले १ लाख ८८ हजार ८४ रुपये ३० सप्टेंबरला शासकीय कोषागारात चलनाने भरणा केली आहे. त्याच दिवशी पाटील यांनी २१ लाख ७९ हजार १३ रुपयांपैकी २१ लाख ३३ हजार ५९३ रुपये भरले असून, अद्याप ४५ हजार ४२० रुपयांची येणे बाकी आहे. पाटील यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे व सचोटीने पार न पाडता अपराधी कृत्य केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT