Businessman Santosh Shinde Case esakal
कोल्हापूर

Gadhinglaj : उद्योजक संतोष शिंदे आत्महत्या प्रकरण; माजी नगरसेविकेसह पोलिसाला कोठडी, न्यायालयात तणावाचं वातावरण

मृत शिंदे व पत्नीच्या चिठ्ठीनुसार माजी नगरसेविकेसह राहुल राऊत, विशाल बाणेकर, संकेत पाटे यांच्याविरोधात आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

गडहिंग्लज : उद्योजक संतोष शिंदे यांनी (Businessman Santosh Shinde) पत्नी तेजस्विनी व मुलगा अर्जून यांच्यासह आत्महत्या केल्याप्रकरणी अटक केलेल्या सहायक पोलिस निरीक्षक राहुल श्रीधर राऊत (रा. निलजी, ता. गडहिंग्लज) याच्यासह येथील माजी नगरसेविकेला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्या. सुजित राठोड यांनी ३० जूनअखेर पोलिस कोठडी सुनावली.

दरम्यान, संशयितांना न्यायालयात हजर करण्यासाठी नेल्याची बातमी वाऱ्या‍सारखी शहरात पसरली. यामुळे न्यायालयाच्या आवारात गर्दी झाल्याने तणावपूर्ण वातावरण होते. मृत शिंदे व पत्नीच्या चिठ्ठीनुसार माजी नगरसेविकेसह राहुल राऊत, विशाल बाणेकर, संकेत पाटे यांच्याविरोधात आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

यातील माजी नगरसेविका व राऊत या दोघांना कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने विजापूरमधून अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर केले. अ‍ॅड. नीता चव्हाण यांनी सरकारतर्फे म्हणणे मांडले. त्यांना सरकारी वकील अ‍ॅड. एस. ए. तेली यांनी सहकार्य केले. आणखीन दोन संशयितांचा शोध सुरु आहे.

त्यांच्याशी या दोघांचे काही संगनमत आहे का याची चौकशी, मृत संतोष व माजी नगरसेविका यांच्यातील आर्थिक व्यवहार तपासणे, मोबाईलवरील तांत्रिक पुराव्यांचे संकलन आणि समाजातील रोष लक्षात घेता दोघांनाही अधिकाधिक कस्टडी देण्याबाबत अ‍ॅड. चव्हाण यांनी युक्तिवाद केला. संशयितांच्या वकीलांनी कमीतकमी कस्टडीची मागणी केली. या युक्तिवादानंतर न्या. राठोड यांनी पाच दिवसांची कोठडी सुनावली.

दरम्यान, मुळात आत्महत्येनंतर त्याला कारणीभूत असलेल्या दोन्ही संशयतिांच्या विरोधात समाजात दिवसेंदिवस रोष वाढत होता. त्यांना आज कोर्टात नेणार असल्याचे कळताच पोलिस ठाणे, न्यायालय आवारात तरुणांची मोठी गर्दी झाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी संशयितांना कोर्टामध्ये नेताच प्रवेशद्वार बंद केले. बाहेर मोठा पोलिस बंदोबस्तही लावला.

वेळ होईल तशी गर्दी वाढू लागली. न्यायालयीन कामकाजानंतर पोलिसांनी आधी गर्दीला मुख्य प्रवेशद्वारबाहेर घालविले. त्यानंतरच संशयितांना वाहनात बसवून पोलिस ठाण्याला आणले. या तणावाच्या पार्श्‍वभूमीवरच उपअधीक्षक राजीव नवले, निरीक्षक गजानन सरगर, उपनिरीक्षक विक्रम वडणे, शितल सिसाळ यांच्यासह पोलिस फौजफाट्यात संशयितांचा पोलिस ठाणे ते न्यायालयापर्यंतचा प्रवास केला गेला.

कर्नाटकचे वकील अन् रोष...

संशयितांचे वकीलपत्र घेवू नये म्हणून नागरिकांनी बार असोसिएशनला विनंती केली होती. त्यानुसार स्थानिक एकाही वकीलांनी वकीलपत्र घेतले नव्हते. परंतु, संकेश्‍वरचे एक वकील संशयितांची बाजू मांडण्यास येणार असल्याचे कळताच जमावात रोष वाढला. त्यावेळी पोलिसांनी कोणीही कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले. वकील आवारात आल्याचे कळताच जमाव त्यांच्याकडे धावून जावू लागला. मात्र पोलिस बंदोबस्त असल्याने वकीलांना सुरक्षितरित्या न्यायालयात नेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT