कोल्हापूर

पत्रिकांपासून साकारताहेत 'चेतना' दायी गणेशमूर्ती

नंदिनी नरेवाडी - पाटोळे

'चेतना' या संस्थेत हे प्रशिक्षण सुरू आहे. त्यांना घरातील शिल्लक पत्रिका, रद्दी दिल्यास या अनोख्या मूर्तिकलेला वेगळा आयाम लाभणार आहे.

कोल्हापूर : श्रीगणरायाच्या आगमनाची आतुरता आतापासूनच लागली आहे. दरवर्षी घराघरांत मनामनातल्या कल्पकता व कौशल्याचा सुरेख संगम साधत नावीन्यपूर्ण गणेशमूर्ती व सजावट साकारली जाते. (ganesh idols are being made from different cards at chetna sanstha in kolhapur)

यंदाही कोरोनाचे सावट असताना शाळकरी मुले घरीच आहेत. यातील गतिमंद मुलांच्या हस्तकौशल्याला वाव देण्यासाठी गणेशमूर्ती साकारण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी विवाह समारंभापासून ते वास्तुशांतीपर्यंत वेगवेगळ्या पत्रिकांचा वापर कल्पकतेने केला जातो. यातूनच रद्दीत जाऊ पाहणाऱ्या हजारो पत्रिकांना एकत्र करून शेकडो कागदी मूर्ती ही मुले आपापल्या परीने बनवत आहेत. 'चेतना' या संस्थेत हे प्रशिक्षण सुरू आहे. त्यांना घरातील शिल्लक पत्रिका, रद्दी दिल्यास या अनोख्या मूर्तिकलेला वेगळा आयाम लाभणार आहे.

राजारामपुरी येथील निसर्गप्रेमी प्रतिम कारेकर यांच्या मुलाचा विवाह गेल्या फेब्रुवारीत होता. त्यापूर्वी कारेकर कुटुंबाने नातेवाईक व मित्रपरिवारासाठी निमंत्रण पत्रिका तयार केल्या आणि विवाहाच्या अगदी पंधरा-वीस दिवसांपूर्वी विवाह समारंभावर मर्यादा घातली. त्यामुळे पत्रिकांचे काय करायचे?, असा प्रश्न समोर आला. विवाह समारंभ उरकल्यानंतर त्या पत्रिकांचा चांगल्या पद्धतीने विनियोग कसा होईल, यासाठी पर्याय शोधत होत्या. कागदापासून विविध वस्तू तयार केल्या जातात, याची कल्पना त्यांना होती.

त्यादृष्टीने विचार केल्यानंतर त्यांनी चेतना विद्यामंदिरमध्ये चौकशी केली. तिथे कागदापासून गणेशमूर्ती तयार करत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी त्वरित तिथे पत्रिका जमा केल्या. हा मेसेज त्यांनी काही व्हॉटस्‌ ॲप ग्रुपवर टाकल्यानंतर पाच-सहा जणांनी त्यांच्याकडेही अशा पत्रिका शिल्लक असून, त्या चेतना संस्थेकडे देण्याची इच्छा व्यक्त केली. निसर्गपूरक या कल्पनेमुळे आस्था असलेल्या पत्रिकांचा विनियोग करण्यात त्या यशस्वी झाल्या.

माझ्या मुलाच्या लग्नाच्या पत्रिका शिल्लक होत्या. त्यावर देवाचे फोटो, कुलदेवतेचे नाव असल्यामुळे त्यामध्ये भावना अडकल्या होत्या. त्या फेकूनही देण्यास मन होत नव्हते. म्हणून त्याचा पर्यावरणपूरक कसा वापर करता येईल, असा विचार केला आणि ही संकल्पना पुढे आली.

- प्रतिम कारेकर

सात-आठ वर्षे चेतना स्कूलमध्ये कागदी मूर्ती तयार केल्या जातात. यामुळे मुलांच्या हातालाही काम मिळते आणि पर्यावरणाची हानीही टाळली जाते. दरवर्षी कागदाच्या लगद्यापासून पाचशे घरगुती व सार्वजनिक मूर्ती बनवितो.

- दया बगरे, संस्थापक सदस्या, चेतना स्कूल

(ganesh idols are being made from different cards at chetna sanstha in kolhapur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT