Bharat Gogavale Sakal
कोल्हापूर

Bharat Gogavale: गोगावलेंचं मंत्रिपद आता 'राम'भरोसे! म्हणाले, देवदेवता ताकद लावून...

नव्या वर्षात महिन्याभरात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

कोल्हापूर : राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश व्हावा अशी तीव्र इच्छा शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी वारंवार बोलून दाखवली आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी ही सुप्त इच्छा व्यक्त केली आहे. कोल्हापरमध्ये अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर आपण देवीला साकडं घातल्याचं त्यांनी सांगितलं.

तसेच या नव्या वर्षात महिन्याभरात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अन् त्यात आपल्याला संधी मिळेल असंही ते यावेळी म्हणाले. (Gods will take care of mu ministrial post says ShivSena Bharat Gogavale)

अंबाबाई इच्छा पूर्ण करेल

गोगावले म्हणाले, "आमच्या मतदारसंघातील लोकांची, कार्यकर्त्यांची कुटुंबियांची सर्वांचीच इच्छा आहे की मला मंत्रिपद मिळावं. असं वाटतंय की या नवीन वर्षामध्ये पहिल्या महिन्यात ती इच्छा पूर्ण होईल असं वाटतं आम्हाला. एकच इच्छा आता आमची राहिलेली आहे, ती अंबाबाई पूर्ण करेल असं वाटतं" (Latest Marathi News)

सर्वजण ताकद लावून इच्छा पूर्ण होईल

यावेळी आमचा प्रवास अजून लांबला, तुळजाभवानीला गेलो, अक्कलकोटला गेलो आणि आता महालक्ष्मीला आलो. आता दोन-तीन देव वाढले, त्यामुळं सर्वजण ताकद लावून ती पण इच्छा पूर्ण होईल असं वाटतंय, अशी आशा यावेळी मीडियाशी बोलताना गोगावले यांनी व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर शेअर बाजार कोसळणार; कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास काय होईल?

Pandharpur Vidhansabha: पंढरपूरात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण ?

Latest Marathi News Updates live : अजित पवार गटातील कार्याध्यक्ष, जनरल सेक्रेटरींची शरद पवारांच्या पक्षात घरवापसी

Mobile Addiction : दिवाळीच्या सुट्टीत पालकांना ब्लॉक करून मुले रिल्स, गेम्सच्या आहारी....सोशल मीडियावर नको ते उद्योग

US Election : अमेरिकेला मिळणार पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष? कमला हॅरिस यांच्या गावी विजयाची उत्कंठा

SCROLL FOR NEXT