कोल्हापूर : सलग तीन दिवसांच्या सुटीनंतर गोकुळ निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडाली. संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्यासह ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नावीद मुश्रीफ, विद्यमान संचालक अमरिषसिंह घाटगे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, संस्थापक अध्यक्ष आनंदराव पाटील- चुयेकर यांचे पुत्र शशिकांत पाटील-चुयेकर, ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांचे पुत्र चेतन नरके, रमा बोंद्रे यांच्यासह १९५ इच्छुकांनी अर्ज दाखल केले. आजअखेर २१८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
गुरुवारी (ता. २) अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. दरम्यान, अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवार, त्यांचे सूचक, अनुमोदक व कार्यकर्त्यांच्या आलिशान वाहनांमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर गर्दीने फुलून गेला.
सलग तीन दिवस सुटी होती. त्यामुळे, आज तसेच गुरुवार (ता. १)पर्यंत अर्ज भरण्यासाठी नेत्यांचे वारसदार तसेच त्यांचे इतर सर्वसामान्य कार्यकर्तेही गर्दी करतील. करवीर प्रांत कार्यालयात सकाळी नऊपासूनच इच्छुकांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली. उमेदवार, सूचक, अनुमोदक यांच्यासह एक-एका इच्छुक उमेदवारासोबत दहा ते पंधरा कार्यकर्त्यांचा गराडा होता. एवढेच नव्हे तर प्रांत कार्यालयासमोर आलिशान वाहने पार्किंग करण्यासाठी जागाही अपुरी पडली. या सर्वांमध्ये पोलिसांची मात्र धावपळ झाली.
यांनी दाखल केले अर्ज
‘गोकुळ’चे अध्यक्ष आपटे, चेतन नरके, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, जि. प. सदस्य जीवन पाटील, गोकुळ ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, दीपक पाटील, ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, माजी संचालिका अरुंधती घाटगे, सदाशिवराव चरापले, हिंदुराव चौगले, विद्यमान सदस्य उदय पाटील, माजी संचालक फिरोजखान पाटील, संचालक बाळासाहेब खाडे, वीरेंद्र मंडलिक, अजित नरके, ज्येष्ठ संचालक रणजितसिंह पाटील, विशाल पाटील, संचालक धैर्यशिल देसाई, माजी संचालक दौलतराव जाधव,
प्रवीणसिंह पाटील, विजयसिंह पाटील, बाबासाहेब देवकर, प्रदीप पाटील-भुयेकर, रावसो पाटील, प्रकाश चव्हाण, कर्णसिंह गायकवाड, वसंतराव धुरे, यशवंत नांदेकर, संचालक विश्वास जाधव, संचालिका अनुराधा पाटील, अश्विनी पवार-पाटील, भुदरगडचे माजी सभापती नंदकुमार ढेंगे, बाजार समिती संचालक सचिन घोरपडे, किरणसिंह पाटील, जि. प. सदस्य अरुण इंगवले, संचालक पांडुरंग धुंदरे, जि.प. माजी सदस्य अभिजित तायशेटे, रमा बोंद्रे, प्रकाश पाटील यांच्यासह इतरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
इच्छुकांकडून भेटीगाठी
‘गोकुळ’साठी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरल्यावर पालकमंत्री सतेज पाटील यांची कसबा बावडा येथील त्यांच्या अजिंक्यतारा येथील कार्यालयात, तर आमदार पी. एन. पाटील यांची फुलेवाडी येथील त्यांच्या गॅरेजमध्ये भेट घेतली. ठरावदार किंवा कार्यकर्त्यांना सोबत घेऊनच या इच्छुक उमेदवारांनी नेत्यांना भेटून आपली अपेक्षा व्यक्त केली आहे.
इच्छुकांकडून शक्तिप्रदर्शन
‘गोकुळ’ निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी आपापल्या नेत्यांना आपल्यामागे किती ठराव आहेत, हे दाखविण्यासाठी शक्तिप्रदर्शन करीतच अर्ज दाखल केले. कोणी एकसारख्या पांढऱ्या टोप्या, तर कोणी कापशी टोपी घालूनच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले. शाहू आघाडीतून सतेज पाटील यांनी, तर सत्तारूढमधून पी. एन. पाटील यांनी आपल्याला उमेदवारी द्यावी, यासाठी या इच्छुकांनी दोन्ही नेत्यांकडे आपल्या कार्यकर्त्यांसह भेट घेतली.
उमेदवार व त्यांच्या सूचकांनी गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न करावा. उमेदवार किंवा सूचकांनी अर्ज दिला तर कोरोना संसर्ग वाढीला आळा बसविता येईल. तसेच, उद्यापासून एक उमेदवार आणि एक सूचक दोघांनाच प्रवेश दिला जाईल.
- वैभव नावडकर, करवीर प्रांताधिकारी व ‘गोकुळ’ निवडणूक अधिकारी
संपादन - अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.