'जावयाचा ठेका या पलीकडे विचार न करणाऱ्या लोकांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.'
कोल्हापूर : गोकुळसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी हिंमत असेल तर स्वत: उत्तरे द्यावीत, असे आव्हान ‘गोकुळ’च्या संचालिका शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांनी दिले.
‘प्रसारमाध्यमांसमोर येण्याचे धाडस नसल्यानेच विद्यमान चेअरमनना वेठीस धरून ‘जबरदस्तीने’ त्यांच्या सहीचे पत्रक सतेज पाटलांनी प्रसिद्धीस दिले आहे. मी केलेले आरोप जर खोटे असतील तर आजही माझे खुले आव्हान स्वीकारावे आणि सतेज पाटलांनी कधीही एका व्यासपीठावर सामोरासमोर यावे. सर्व आरोप पुराव्यानिशी सिद्ध करण्याची माझी तयारी आहे, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, ‘गोकुळ’चे नेते कालपर्यंत घटलेले दूध संकलन आणि विक्री याबाबत चिंता व्यक्त करत होते. आज तेच लोक संघ कसा फायद्यात आहे, हे पटवून देत आहेत, ही बाब हास्यास्पद आहे. नेत्यांचा हा विरोधाभास लक्षात न येण्याएवढी जनता दूधखुळी नाही. सत्तांतर होऊन दोन वर्षे झाली, तरीही महाडिकांचे टँकर आणि जावयाचा ठेका या पलीकडे विचार न करणाऱ्या लोकांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.
एकीकडे दूध संघाची (Gokul Milk Union) स्वतःच्या कुकर्माने वाताहत केलेली असताना, अजूनही वैयक्तिक आरोपांमध्ये धन्यता मानणाऱ्या लोकांकडून दुसरी अपेक्षा नव्हती. गोकुळचे दूध संकलन घटले आहे. मुंबईतील दूध विक्री घटली आहे. पुण्यातील वितरण व्यवस्था चांगली असताना ठेका का बदलला, हे प्रश्न विचारले असताना कोणाच्या जावयांचा किंवा पै-पाहुण्यांचा ठेका आहे, याची उत्तरे दिली आहेत.
‘विद्यमान अध्यक्ष, संचालक यांच्या पै-पाहुण्यांकडे किती ठेके आहेत, कोणाचे किती पै-पाहुणे गोकुळमध्ये नोकरीला लावले आहेत, राधानगरी वाहतूक संघ किंवा शेतकरी संघ या नावांखाली कोणाच्या किती गाड्या गोकुळला लावल्या आहेत, पॅकिंग किंवा वितरण व्यवस्था बदलताना कोणते नेते किंवा अधिकाऱ्यांनी किती टक्केवारी ठरवून दिलेले आहे, या सर्व गोष्टींचा खुलासादेखील मी करू शकते; पण वैयक्तिक टीका न करता संघ कसा टिकला पाहिजे. याचे भान सर्वच सत्ताधारी नेत्यांनी ठेवावे, असेही महाडिक यांनी पत्रकात म्हटले आहे.
कोल्हापूर : महाडिकांचे मांजरी बुद्रुक (पुणे) येथील जावई विजय ढेरे यांच्या मालकीच्या गायत्री कोल्ड स्टोरेज या दूध पॅकिंग एजन्सी ऐवजी किकवी येथील अनंत डेअरी यांना दूध पॅकिंगचा ठेका दिल्यामुळे गोकुळ दूध संघाची वर्षाला ४ कोटी रुपये बचत होत आहे. जावयाचा दूध पॅकिंगचा ठेका रद्द झाला आणि महाडिकांचे दूध संघातील ४५ टँकर बंद केल्याने होणारा आर्थिक फायदा थांबल्यामुळे संचालिका शौमिका महाडिक या गोकुळ दूध संघावर आरोप करत असल्याचा पलटवार कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केला.
गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांनी गोकुळच्या किकवी प्रकल्पामध्ये एका नेत्याची गुंतवणूक आहे. ठेके बंद केल्यामुळे तोटा होत असल्याचा आरोप केला होता. याला गोकुळ अध्यक्षांनी (Arun Dongle) लेखी प्रतिउत्तर दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.