Gokul Shirgaon Police Raid Party at Ujalaiwadi Cafe esakal
कोल्हापूर

Kolhapur Crime : उजळाईवाडीत मध्यरात्री कॅफेतील पार्टीवर पोलिसांचा छापा; आयोजक, मालक, डीजे चालकांवर गुन्हा दाखल

नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बेकायदेशीर पार्टीचे आयोजन करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते.

सकाळ डिजिटल टीम

गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात (Gokul Shirgaon Police Station) गुन्हा दाखल असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली.

कोल्हापूर : बेकायदेशीर मद्यसाठा करून, कर्णकर्कश आवाजात, वेळेचे उल्लंघन करून आयोजित केलेल्या ओल्या पार्टीत कॅफे चालकासह आयोजक, डीजे ऑपरेटर, मालक, कामगारांवर मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला. उजळाईवाडी (ता. करवीर) येथे मध्यरात्री ही कारवाई झाली.

दरम्यान, कारवाईत एकूण ५३ हजार ७२५ रुपयांची विदेशी दारू, ८८ हजार ७४० ची रोकड, १ लाख ४० हजारांची डीजे सिस्टीम असा एकूण २ लाख ८२ हजार ४६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात (Gokul Shirgaon Police Station) गुन्हा दाखल असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली.

पोलिसांनी सांगितले, की ‘कॅफे माया’चा मालक दयानंद जयंत साळोखे (रा. उजळाईवाडी ता. करवीर), संयोजक मयुरा राजकुमार चुटानी (रा. नागाळा पार्क, कोल्हापूर), डीजे ऑपरेटर नागेश लहू खरात (रा. फुलेवाडी), डीजे मालक दिगंबर रघुनाथ सुतार (रा. फुलेवाडी), कामगार गजेंद्र रामदास शेठ (रा. बेकर गल्ली, कोल्हापूर) आणि गौरव गणेश शेवडे (रा. न्यू शाहूपुरी, कोल्हापूर) यांच्यावर गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

दरम्यान, नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बेकायदेशीर पार्टीचे आयोजन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सर्वच पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत. पुणे- बंगळूर महामार्गावरील शाहू टोल नाक्याच्या बाजूस असलेल्या उजळाईवाडीतील ‘कॅफे माया’ येथे काल सायंकाळी ओल्या पार्टीचे आयोजन केल्याची माहिती मिळाली होती. पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर वाघ यांच्‍या पथकासह तेथे मध्यरात्री छापा टाकला.

तेथील पार्टीत ६० ते ६५ पुरुष व ४० ते ४५ महिला उपस्थित होत्या. त्यामुळे बेकायदेशीर मद्याचा साठा यासह अन्य नियमांचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून मद्याचा साठा जप्त केल्याची माहिती निरीक्षक कळमकर यांनी दिली. सहाय्यक फौजदार हरिष पाटील, खंडेराव कोळी, पोलिस हेड कॉन्स्टेबल विलास किरोळकर, अमित सर्जे, सचिन पाटील, संतोष पाटील, युवराज पाटील, प्रवीण पाटील, अमर आडुळकर, सतीश पोवार, रणजित कांबळे, समीर कांबळे, पोलिस कॉन्स्टेबल सोमराज पाटील यांनी ही कारवाई केली.

अशा पार्ट्यांवर धडक कारवाई होणार

नववर्षाच्या स्वागतासाठी बेकायदेशीर, विनापरवाना, विहीत वेळेचे उल्लंघन करणाऱ्या पार्ट्यांवर अशाच प्रकारची धडक कारवाई केली जाईल. त्यामुळे सर्व परवानग्या घेऊन नियमातच उत्साहाने नववर्षाचे स्वागत करावे, अन्यथा तेथेही कारवाई केली जाईल, असाही इशारा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT