Sugarcane Season esakal
कोल्हापूर

उसाला दुसरा हप्ता 100 रुपयासह 50 रुपये देण्याच्या प्रस्तावास मान्यता; साखर आयुक्तांचा महत्त्वाचा आदेश जारी

सकाळ डिजिटल टीम

गतवर्षी झालेल्या आंदोलनात २०२२-२३ या हंगामातील गाळप झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना (Farmers) प्रतिटन १०० रुपयांचा दुसरा हप्ता देण्याबाबत तोडगा निघाला होता.

जयसिंगपूर : सन २०२२-२३ या गळीत हंगामातील गाळप झालेल्या उसाला (Sugarcane) दुसरा हप्ता १०० रुपये व ५० रुपये देण्याच्या प्रस्तावास शासनाने (Maharashtra Government) मान्यता दिली. याबाबत साखर आयुक्तांना तसा आदेश सोमवारी (ता. ३०) देण्यात आला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून (Swabhimani Shetkari Sanghatana) ही मागणी सातत्याने करण्यात येत होती. गतवर्षी झालेल्या आंदोलनात २०२२-२३ या हंगामातील गाळप झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना (Farmers) प्रतिटन १०० रुपयांचा दुसरा हप्ता देण्याबाबत तोडगा निघाला होता. या प्रस्तावास शासनाने मान्यता न दिल्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळू शकले नव्हते. गेल्या दहा महिन्यांपासून मुख्य सचिवांकडे हा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता.

मुख्यमंत्र्यांचा आज (ता. १) जिल्हा दौरा आहे. त्या पार्श्वभूमीवर हा आदेश झाला आहे. गतवर्षी प्रतिटन तीन हजारांपेक्षा जास्त दर दिलेल्या कारखानदारांना पन्नास रुपये तर तीन हजारांपेक्षा कमी दर दिलेल्या कारखान्यांना शंभर रुपये शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहेत. या आदेशामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास सहाशे कोटींची रक्कम मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Captain Rohit Sharma : रोहित शर्माने धोनीची परंपरा कायम राखली, विजयाची ट्रॉफी दिली युवकांच्या हाती अन्... Video Viral

Akshay Shinde : मोठी अपडेट! बदलापूर प्रकरणात शाळेचा अध्यक्ष अन् सचिवाला कोर्टाचा दणका

Virat Kohli: विराटचं मोठं मन! शाकिब अल हसनला दिली बॅट गिफ्ट, Video होतोय व्हायरल

Rahul Gandhi: अनंत अंबानीच्या लग्नावर राहुल गांधींनी उपस्थित केला प्रश्न; म्हणाले, अंबानी कुटुंबाचा पैसा...

IND vs BAN: १८ वी कसोटी मालिका अन् १८० व्या सामन्यात विजय! टीम इंडियासाठी कानपूर सामना ठरला विक्रमी

SCROLL FOR NEXT