Grain market migration stalled in Tembalaiwadi One and half crore waste of grain market kolhapur  sakal
कोल्हापूर

धान्य बाजाराचे दीड कोटी वाया

टेंबलाईवाडीत धान्य बाजाराचे स्थलांतर रखडले; सहा महिन्यांत पुन्हा लक्ष्मीपुरीतून व्यवसाय

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शहरातील धान्य व्यापाऱ्यांसाठी बाजार समितीने टेंबलाईवाडी येथे स्‍थापन केलेल्या धान्य बाजारात व्यापारी स्थलांतरित झाले नाहीत. त्यामुळे बाजार समितीचा दीड कोटीचा खर्च वाया गेल्यात जमा आहे. नव्या बाजारातील पायाभूत सुविधा, देखभाल दुरुस्तीसाठी खर्च वाढत आहे. धान्य व्यापारी स्थलांतराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बाजार समितीने घाऊक धान्य व्यापाऱ्यांसाठी टेंबलाईवाडी येथे धान्य बाजार स्थापन केला. येथे एकूण २४० भूखंड आहेत. त्यांपैकी ३० व्यापाऱ्यांनी येथे गोदाम बांधली आहेत. पाच वर्षांपूर्वीपर्यंत धान्य बाजारांच्या जागेत बांधलेले गाळे रिकामे होते, तसेच गोदामी रिकामी होती. सुरक्षा नसल्यामुळे बहुतांशी येथील साधनसामुग्रींची तोडफोड झाली होती.

तीन वर्षांपूर्वी बाजार समितीने येथे कुंपण घातले तसेच रस्ते केले. विजेची, पाण्याची सोय केली. लक्ष्मीपुरीतील धान्य बाजार टेंबलाईवाडीत स्थलांतरित व्हावा, यासाठी तत्कालीन वाहतूक पोलिस निरीक्षक, महापालिका आयुक्तांनी पुढाकार घेत लक्ष्मीपुरीतील धान्य व्यापाऱ्यांची बैठक घेतली. त्यांना धान्य बाजार टेंबलाईवाडी येथे स्थलांतरित करण्याची विनंती केली. त्यासाठी बाजार समितीने पायाभूत सुविधा दिल्या. त्यानंतर काही धान्य व्यापारी येथे स्थलांतरित झाले. काहींनी व्यवसाय सुरू केले; पण सहा महिन्यांत पुन्हा येथील व्यवहार बंद करून लक्ष्मीपुरीतून व्यवसाय सुरू ठेवले. केवळ पाच-सहा व्यापाऱ्यांची गोदामे मात्र येथे आहेत. उर्वरित सर्व परिसर जैसे थे पडून आहे.

लक्ष्मीपुरीतील धान्य व्यापारी टेंबलाईवाडीत स्थलांतरित होण्यास तयार नाहीत. यात वाहतूक शाखेच्या तत्कालीन पोलिस निरीक्षकांची बदली झाली. साहजिकच नवे निरीक्षक आले. महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांची बदली झाली. नवे आयुक्त आले. या दोन्ही यंत्रणांच्या दुर्लक्षातून धान्य बाजाराच्या स्थलांतराचा प्रश्न जैसे आहे. यात बाजार समितीही शांत आहे. परिणामी लक्ष्मीपुरीतील धान्य बाजारातील वाहतुकीची कोंडी व गर्दीची समस्या कायम आहे. बाजार समितीने नव्या बाजारपेठेसाठी केलेला खर्चही वाया गेला आहे.

शेती उत्पन्न बाजार समितीने धान्य व्यापाऱ्यांसाठी टेंबलाईवाडीतील बाजारात सुविधा दिल्या. धान्य व्यापाऱ्यांनी येथे स्थलांतरित होणे अपेक्षित आहे. आम्ही पाठपुरावा करीत आहोत; मात्र प्रतिसाद मिळत नाही. सध्या टेंबलाईवाडीत तीन शिफ्टमध्ये तीन सुरक्षा रक्षक काम करतात. याशिवाय वीज वापर यांचा खर्चही बाजार समिती करत आहे.

- जयवंत पाटील, सचिव, बाजार समिती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

Share Market Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारातील घसरण थांबणार का? आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Sharad Pawar : सरकार बदलायचे लोकांनीच ठरवले आहे....शरद पवार यांचे प्रतिपादन; वरवंडमध्ये रमेश थोरात यांची प्रचार सभा

श्रीदेवीसोबत तुझं कट्टर वैर होतं? माधुरी दीक्षित स्पष्टच म्हणाली- ती एक चांगली अभिनेत्री होती पण मी...

SCROLL FOR NEXT