Hasan Mushrif Satej Patil esakal
कोल्हापूर

Hasan Mushrif : कोल्हापुरातून कोण लढणार माहिती नाही, पण पीएन-सतेज पाटील एकमेकांची नावं घेताहेत; काय म्हणाले मुश्रीफ?

१८ गावांनी सणांमध्ये बंद पुकारून वेळ वाया घालवू नये.

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेसने लोकसभेच्या जिल्ह्यातील दोन्ही जागांची मागणी केली आहे.

कोल्हापूर : शहरालगतची जी गावे महानगरपालिकेच्या (Kolhapur Municipal Corporation) सुविधांचा लाभ घेत आहेत, त्यांचाच आधी हद्दवाढीत समावेश केला जाईल. त्यामुळे १८ गावांनी सणांमध्ये बंद पुकारून वेळ वाया घालवू नये. हद्दवाढीसाठी माझा वेगळा प्लॅन असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी येथे सांगितले.

दहा महिन्यांत हद्दवाढ करणार असल्याचे वक्तव्य मुश्रीफ यांनी केले होते. प्रस्तावातील गावांतून विरोध होऊ लागला. त्यांनी १२ रोजी बंद पुकारला असल्याचे सांगितल्यानंतर पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘१८ गावे व दोन एमआयडीसींपैकी जी महापालिकेच्या सुविधांचा लाभ घेत आहेत अशा लगतच्या मोजक्या गावांचा हद्दवाढीत समावेश केला जाणार आहे. ज्यांचा वाद आहे, त्यांच्याशी चर्चा करावी लागेल.

त्यामुळे गावांनी सणात बंद पुकारून वेळ वाया घालवू नये. लोकसंख्येचा विचार करता केएमटी बसचा ताफा १०० ई बस आल्याशिवाय पूर्ण होणार नाही. त्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. या बस आल्याने इतर खर्च कमी होऊन तोटाही कमी होईल. त्यासाठी नगरविकास मंत्र्यांशी चर्चा केली जाईल.

महापालिकेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांचे काम जिल्हाधिकाऱ्यांनी २६ दिवसांवरून १८ दिवस केले आहे. प्रशासकांना त्याबाबतची माहिती तपासण्यास सांगितले आहे. तसेच रोजंदारींवरील लोकांना कायम करता येत नसेल, तर त्यांना पुरेसे काम दिले गेले पाहिजे, असे ते म्हणाले.

कचऱ्याचे डोंगर होणार नाहीत

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘२२० टन कचरा दररोज संकलित होतो. त्यासाठी १६९ टिप्पर आहेत. त्यातील बरेच खराब होत आहेत. नवीन १०० टिप्परची आवश्‍यकता आहे. बायोमायनिंगचे काम ८५ टक्के झाले आहे. यानंतर कचऱ्याचे डोंगर होणारच नाहीत अशी व्यवस्था करण्याची सूचना महापालिकेला केली आहे. त्यासाठी लागणारा निधी देण्याचा प्रयत्न आहे.’’

काँग्रेसचा उमेदवार माहिती नाही

काँग्रेसने लोकसभेच्या जिल्ह्यातील दोन्ही जागांची मागणी केल्याबद्दल ते म्हणाले, ‘येथून कोण लढणार माहिती नाही, पण पी. एन. पाटील व सतेज पाटील एकमेकांची नावे घेत आहेत. उमेदवार आहेत की नाही माहिती नाही. महायुती मात्र आपले खासदार निवडून आणणार.’

पालकमंत्री म्हणाले

  • नवरात्रीपूर्वी रस्ते करण्याबरोबरच खड्डे भरून घेण्याची सूचना

  • भाविकांच्या सुविधांसाठी महापालिका, पोलिसांनी नियोजन करावे

  • जीएसटीचे पैसे जादा मिळावेत यासाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न

  • आपला दवाखाना सुरू करण्यासाठी जागेकरिता विनंती करणार

  • २७ शासकीय रुग्णालये एम्ससारखी करणार

  • सीपीआर अधिष्ठातांची खरेदी करण्याची मर्यादा ४० टक्क्यांवर

  • टेंबलाईवाडी येथील इमारतीचा आयटी पार्कबाबत विचार करू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT