‘सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनगुंटीवार इतिहास वाचल्याखेरीज कोणताही निर्णय घेणार नाहीत. ते विद्वान आहेत.'
कोल्हापूर : ‘शिवछत्रपतींनी (Shivaji Maharaj) वापरलेली वाघनखं कोल्हापुरात येणार असतील, तर त्याचे स्वागतच आहे. ती शिवछत्रपतींनीच वापरली आहेत का, अशी विचारणा आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) करत असतील तर त्यांना वाघनखांची काय माहिती आहे, हे मला माहीत नाही,’ अशी टीका वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी येथे केली.
शेतकरी सहकारी संघाच्या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुश्रीफ म्हणाले, ‘सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनगुंटीवार इतिहास वाचल्याखेरीज कोणताही निर्णय घेणार नाहीत. ते विद्वान आहेत. त्यांनी वाघनखांबाबतची माहिती घेतली असणार. महायुती सरकारच्या माध्यमातून वाघनखं (Waghnakh) कोल्हापुरात येणार असतील, तर त्यांचे स्वागत केले जाईल.’
खासदार प्रा. संजय मंडलिक म्हणाले, ‘वाघनखं कोल्हापुरात येणार असतील, तर त्याचा आम्हाला आनंदच आहे. आदित्य ठाकरेंना स्वतःची नखं, वाघनखं वाटत असतील. शेतकरी संघाची जागा अचानक ताब्यात घेणे चुकीचे आहे. चर्चेतून मार्ग काढता आला असता. या पद्धतीने जागा ताब्यात घेणे म्हणजे सहकार चळवळीचा अपमान आहे.’
दरम्यान, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी अफजलखानाच्या वधावेळी शिवरायांनी वापरलेली ही वाघनखं नाहीत. त्यामुळे राज्य शासनाने शिवप्रेमींची दिशाभूल करू नये, असे म्हटले आहे. तसेच ती वाघनखं शिवरायांची आहेत, याचे शासनाने पुरावे द्यावेत, असे स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.