politics esakal
कोल्हापूर

आमदार कोरेंसोबत होतो पण, पैसे देताना नव्हतो; मुश्रीफांचा खुलासा

यावेळी भाजप आमदार पडळकर यांच्या आरक्षण प्रश्नावरील वक्तव्याचा समाचार घेतला.

सकाळ वृत्तसेवा

यावेळी भाजप आमदार पडळकर यांच्या आरक्षण प्रश्नावरील वक्तव्याचा समाचार घेतला.

कोल्हापूर : पक्षाचा महापौर करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाला ३५ लाख रुपये दिले. त्यावेळी हसन मुश्रीफ आमच्यासोबत होते, असे आमदार विनय कोरे (MLA Aamdar kore) यांनी म्हटले होते. त्यावर आमदार कोरेंसोबत आम्ही होतो पण, पैसे देते वेळी मी सोबत नव्हतो, असे मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी स्पष्ट केले. तसेच कोरे यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे, महापालिकेच्या राजकारणात सुरू असलेला घोडेबाजार थांबविण्यासाठी श्री. कोरे यांनी पुढाकार घेतला होता. त्याच्याअनुषंगाने कोरे यांनी माहिती दिली. मात्र त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचे श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. या विषयाला फार महत्त्व देण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महानगरपालिका निवडणुकीत (Munciple coporation election 2021) महाविकास आघाडी (Mahavikas aaghadi sarkar) एकत्र लढणार, की नाही ते ज्या त्या पक्षाच्या ताकदीनुसार ठरेल, असेही त्यांनी सांगितले. या वेळी त्यांनी भाजप आमदार पडळकर (Gopichand padalakar) यांच्या आरक्षण प्रश्नावरील वक्तव्याचा समाचार घेतला.

गव्याला जंगलात सुरक्षित सोडणे आवश्यक

सध्या शहरात गव्यांची संख्या वाढली असून लोकांत भीतीचे वातावरण आहे. म्हणूनच गव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाशी चर्चा करून सूचना दिल्या आहेत. गव्याला बेशुद्ध करून सुरक्षितपणे जंगलात सोडण्याची गरज असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

ओबीसीं डेटा तीन महिन्यात करणार

राज्यात ओबीसी आरक्षण (OBC Reservation) प्रश्न गंभीर बनला आहे. आरक्षण होत नाही, तोपर्यंत निवडणुका न घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ओबीसींचा डेटा संकलित करण्यासाठी नियोजन केले असून पुढील तीन महिन्यांत ही माहिती सादर केली जाईल, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. भाजपकडून आरक्षणाबाबत महाविकास आघाडीवर होत असलेल्या आरोपाचे खंडन मंत्री मुश्रीफ यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर शेअर बाजार कोसळणार; कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास काय होईल?

Pandharpur Vidhansabha: पंढरपूरात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण ?

Latest Marathi News Updates live : अजित पवार गटातील कार्याध्यक्ष, जनरल सेक्रेटरींची शरद पवारांच्या पक्षात घरवापसी

Fact Check :'गंभीरकडून काही होणार नाही, मला कमबॅक करावं लागेल'; MS Dhoniचा Video Viral, चाहते सैराट

Mobile Addiction : दिवाळीच्या सुट्टीत पालकांना ब्लॉक करून मुले रिल्स, गेम्सच्या आहारी....सोशल मीडियावर नको ते उद्योग

SCROLL FOR NEXT