hasan mushrif sakal
कोल्हापूर

उद्धव ठाकरे सर्वांचे फेवरेट; भाजपने कितीही ठरवलं तरी राष्ट्रपती राजवट लागणं सोपं नाही

मंत्री नवाब मलिक यांनी भाजपाच्या अनेक नेत्यांचे भ्रष्टाचार उघड केले आहेत.

नरेंद्र बोते

मंत्री नवाब मलिक यांनी भाजपाच्या अनेक नेत्यांचे भ्रष्टाचार उघड केले आहेत.

कागल : भाजप प्रणित केंद्र सरकार विविध यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकार (Central Govt.) विरोधात कोणी बोलले की त्याला ईडीची भीती घातली जाते. महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र महाविकास आघाडी एकसंघ असून जोपर्यंत अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मनात आहे, तोपर्यंत म्हणजे पुढील पंचवीस वर्षे महाविकास आघाडीचे सरकार अबाधित राहणार आहे, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan mushrif) यांनी व्यक्त केला.

मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ कागल येथे राष्ट्रवादी काँगेसच्यावतीने निषेध फेरी काढून निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्रातील मोदी सरकारच्या दडपशाही विरोधात आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. येथील गैबी चौकातून बसस्थानकापर्यंत निषेध फेरी काढण्यात आली.

यावेळी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, मंत्री नवाब मलिक यांनी भाजपाच्या अनेक नेत्यांचे भ्रष्टाचार उघड केले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ही सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर ईडी कडून झालेली कारवाई चुकीच्या पद्धतीने आहे. त्यामुळे ईडीचा धाक दाखवून दडपशाहीने राजकारण करणाऱ्या केंद्र सरकारचा आम्ही निषेध करतो.

ते म्हणाले, राज्यात कायदा व सुव्यवस्था गंभीर बनली तरच राष्ट्रपती राजवट लागू शकते .उलट देशात महाराष्ट्र राज्यात शांतता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशात दोन किंवा तीन नंबरचे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. त्यामुळे भाजपाने किती जरी म्हटले तरी राष्ट्रपती राजवट लागणे इतके सोपे नाही. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपा जितके प्रयत्न करेल तितकी महाविकासआघाडी अधिक मजबूत होईल . यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, घोरपडे कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, मनोज फराकटे, शशिकांत खोत, सूर्यकांत पाटील, प्रवीण काळबर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, विवेक लोटे, अजित कांबळे, संजय चितारी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे यांच्या पराभवाची ५ कारणं; दोघांचं भांडण, महेश सावंतांचा लाभ

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: माळशिरसात सातपुते २०७५ मतांनी पिछाडीवर

महायुती २०० पार, तर मविआची अनेक जागांवर हार, जाणून घ्या सर्व पक्षांच्या 'स्ट्राइक रेट'चा अहवाल

Siddharth Shirole Shivajinagar Election 2024 Result: शिवाजीनगरात काँग्रेसला बंडखोरीचा फटका, सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT