kolhapur  sakal
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा बँकेवर अध्यक्ष म्हणून लागणार हसन मुश्रिफांची वर्णी

सकाळी बैठक; दुपारी निवड; बैठकीत मुश्रीफ यांच्यावरच शिक्कामोर्तब

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष,(kdcc bank) उपाध्यक्ष पदाचा उमेदवार ठरवण्यासाठी सत्तारूढ गटाच्या १८ संचालकांसह नेत्यांची बैठक गुरूवारी (ता.२०) सकाळी शासकीय विश्रामगृहावर बोलवण्यात आली आहे. या बैठकीत दोन्ही पदांचे उमेदवार निश्‍चित झाल्यानंतर दुपारी तीन वाजता होणाऱ्या संचालकांच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होईल. अध्यक्ष पदासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ(minister hasan mushrif) हे प्रमुख दावेदार असल्याचे आतापर्यंत दिसत आहे. बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक गुरूवारी (ता. २०) दुपारी तीन वाजता होणाऱ्या संचालक मंडळाच्या(v) बैठकीत होणार आहे. बँकेचे निवडणूक निर्णय अधिकारी अरूण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या संचालकांच्या बैठकीत या निवडी होतील.

बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सत्तारूढ काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप मित्र पक्षांनी २१ पैकी १८ जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेनेला तीन जागा मिळाल्या आहेत. सत्तारूढ गटातून विजयी झालेल्या राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व माजी खासदार श्रीमती निवेदीता माने या सेनेच्याच असल्याचा दावा यापुर्वीच करण्यात आला. बैठकीत या दोघांची भुमिका महत्त्वाची असणार आहे. पदाधिकारी निवडीबाबत चर्चा करण्यासाठी सत्तारूढ आघाडीची बैठक बुधवारी (ता. १९) होती. तथापि ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे काल निधन झाले व आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर श्री. मुश्रीफ मुंबईला गेले आहेत. त्यामुळे ही बैठक उद्याऐवजी गुरूवारी (ता. २०) सकाळी साडेआकरा वाजता बोलवण्यात आली आहे.

शासकीय विश्रामगृहावरच ही बैठक होईल. सत्तारूढ गटाच्या नेत्यांनी प्रक्रिया व पतसंस्था गटात विश्‍वासघात केल्याचा ठपका आमदार डॉ. विनय कोरे यांनी ठेवला आहे. त्यातून प्रचंड नाराज झालेल्या श्री. कोरे यांनी दोन दिवसांपुर्वी श्री. मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील यांची भेट घेऊन तुमच्यासोबत मला गृहीत धरू नका असा इशारा दिला आहे. त्यामुळे गुरूवारच्या बैठकीत श्री. कोरे कोणती भुमिका घेणार याविषयी उत्सुकता आहे.

मुश्रीफांनी नकार दिल्यास

मंत्रीपद, नगरचे पालकमंत्रीपद याचा ताण आपल्यावर असल्याने बँकेचे अध्यक्ष पद नको असे श्री. मुश्रीफ यांचे म्हणणे आहे. पण सर्वांचा मेळ घालायचा म्हटल्यास श्री. मुश्रीफ यांच्याशिवाय पर्यायही नाही. त्यातूनही श्री. मुश्रीफ यांनी नकार दिल्यास आमदार पी. एन. पाटील यांची अध्यक्षपदी निवड होऊ शकते. पण गुरूवारच्या बैठकीत काय होणार यावर हे गणित अवलंबून आहे. गेल्या निवडणुकीप्रमाणे अडीच वर्षाचा फॉर्म्युला पुढे येण्याची शक्यता आहे.

उपाध्यक्षपद कोरे गटाकडे शक्य

निवडणुकीतील सत्तारूढ गटाच्या नेत्यांनी केलेल्या दगाफटक्यामुळे संतापलेल्या श्री. कोरे(vinay kore) यांची मनधरणी अजून झालेली नाही. त्यांच्यासह त्यांना मानणारे तीन संचालक सत्तारूढ सोबत आहेत. यापैकी एकाला उपाध्यक्ष पदाची संधी देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न असेल.(KDCC) त्यांनी नकार दिल्यास काँग्रेसला (congress)उपाध्यक्ष पद देऊन त्यावर आमदार राजू आवळे(mla raju avale) यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

पक्षीय बलाबल असे

  • राष्ट्रवादी काँग्रेस - ८

  • काँग्रेस - ५

  • शिवसेना- ३

  • कोरे - २

  • सत्तारूढमधील शिवसैनिक - २

  • भाजप -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती 200 पार; महाविकास आघाडीची मोठी निराशा

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT