गडहिंग्लज : हसूरचंपू (ता. गडहिंग्लज) येथील औद्योगिक वसाहतीमधील काजू टरफलापासून तेल काढण्याच्या कारखान्याला आज पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्कीटने आग लागली. या आगीत सुमारे अर्ध्या कोटीहून अधिक रक्कमेचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.
याबाबतची माहिती अशी की, जयसिंगपूर येथील उद्योजक सुशील गुप्ता यांनी काही वर्षापूर्वी हसूरचंपू येथील हिरण्यकेशी सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये काजूच्या टरफलापासून तेल काढण्याचा कारखाना सुरु केला. कारखान्यासाठी पाच हजार चौरस फुटाचे शेड उभारण्यात आले आहे. या शेडमधक्ये मोठ्या प्रमाणात काजूची टरफले साठवून ठेवण्यात आली होती. दरम्यान, गुरुवारी पहाटेच्या सुमारास या शेडला शॉर्ट सर्कीटने आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रुप धारण केले.
संपूर्ण शेड आगीने घेरले. आग विझवण्यासाठी गडहिंग्लज व कागलमधून अग्निशमन दलाची तीन वाहने दाखल झाली. जेसीबीच्या माध्यमातून शेडमधील काजूची टरफलाच्या पोती बाजूला काढून टाकण्याचे काम सुरु झाले. तब्बल सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलांनी ही आग अटोक्यात आणली. यासाठी स्थानिक ग्रामस्थांनीही मदत केली. कारखान्याचे शेड, मशिनरी व काजू टरफलाचा कच्चा माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. सुमारे पन्नास लाखाहून अधिक रक्कमेचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, आगीची तमा न बाळगता जेसीबी चालक विवेक शिंदे व तौफीक नाईकवाडे यांनी जेसीबी थेट आगीत घालून टरफलांच्या पोती बाहेर काढून टाकण्याचे मोठे काम केले. जसे टरफल बाहेर टाकत होते, त्या पद्धतीने त्यावर पाणी मारुन आग विझवण्याचेही काम सुरु होते. यामुळेच आग लवकर अटोक्यात येण्यास मदत झाली. शेजारीच आणखीन एक काजूचा कारखाना होता. ही आग लवकर अटोक्यात आली नसती तर मोठा अनर्थ घडला असता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.