Hatkanangale Lok Sabha Election : लोकसभा निवडणूकीचा रोमांच सध्या शिगेला पोहचला आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी त्या-त्या पक्षाचे बडे नेते सध्या मतदारसंघात जाहीर सभा घेत आहेत. यादरम्यान राज्यातील हातकणंगले मतदारसंघात देखील चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात अनेक तगडे उमेदवार असल्याने या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हातकणंगले येथे शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी तसेच वंचित आघाडीचे माजी जिल्हा परिषद सदस्य डी. सी. पाटील आणि शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांच्यात लढत पाहायला मिळत आहे.
लोकसभेचे माजी खासदार बाळासाहेब माने हे रुकडी येथील होते. बाळासाहेब माने यांनी पाच वेळा लोकसभा गाजवली. आता त्यांचे नातू धैर्यशील माने दुसऱ्यांदा लोकसभा नावडणुकीत आपलं नशीब आजमावत आहेत. नेत्यांचे राजकारण त्यांच्या गावातून सुरु होत असे म्हणतात त्यामुळे धैर्यशील माने यांच्या रुकडी या गावातील प्रतिक्रिया जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्या गावातच मतांच विभाजन पाहायला मिळालं.
धैर्यशील माने 2019 ला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून लढले होते, मुरब्बी राजकारणी राजू शेट्टी यांचा त्यांनी पराभव केला होता. वंचित उमेदवारामुळे झालेल्या मत विभाजनाचा फटका देखील शेट्टीना बसला होता. मात्र आता लढाई कोणासाठीही सोपी राहिली नाहीये. गावातील नागतिकांची संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. गावात वंचितचे देखील मतदान आहे. गावाक एकूण 18 हजार मतदान आहे. 2000 मतदान शेट्टी यांचे आहे. एकंदरीतच हातकणंगले मतदारसंघातील लढाई सोपी राहाणार नाहीये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.