Heavy rain in Kolhapur Dajipur esakal
कोल्हापूर

Rain Update : ढगफुटीसदृश पावसाने कोल्हापूर, दाजीपूरला झोडपले; पाच तासांत 137 मिलिमीटर पावसाची नोंद, आजही मुसळधार?

दाजीपूर (Dajipur) येथे काल ढगफुटीसदृश पाऊस झाला.

सकाळ डिजिटल टीम

पाण्याची वाढती आवक लक्षात घेऊन राधानगरी धरणातून (Radhanagari Dam) वीजनिर्मितीसाठी १४०० क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे.

राधानगरी/कोल्हापूर : दाजीपूर (Dajipur) येथे काल ढगफुटीसदृश पाऊस झाला. सायंकाळी साडेचार वाजल्यापासून रात्री साडेनऊपर्यंत केवळ पाच तासांत १३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पाण्याची वाढती आवक लक्षात घेऊन राधानगरी धरणातून (Radhanagari Dam) वीजनिर्मितीसाठी १४०० क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे.

धरणाचा स्वयंचलित दरवाजा खुला होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यालाही पावसाने झोडपले. कुंभी, कासारी लघु पाटबंधारे परिसरातही अतिवृष्टी झाली आहे. काल (मंगळवार) सायंकाळी चारपासून दाजीपूर परिसरात पावसाने सुरुवात केली. साडेचारनंतर पावसाने अचानक उग्र रूप धारण केले.

रात्री साडेनऊपर्यंत केवळ पाच तासांत तब्बल १३७ मिलिमीटर पाऊस कोसळला. कमी वेळेत एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची यंदाची ही पहिलीच वेळ. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी जलाशयात येत आहे. यामुळे राधानगरी धरण पायथ्याच्या वीजगृहातून चौदाशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. पाणी वाढण्याची शक्यता असून, सध्या धरणाची पातळी ३४७ फूट इतकी आहे.

आवक वाढल्यास स्वयंचलित दरवाजा उद्या सकाळपर्यंत खुला होऊ शकतो. दरम्यान, काळम्मावाडी धरणाच्या पायथ्याला असलेल्या वीजगृहासाठीही उद्यापासून विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. तसे आदेश जलसंपदा विभागाला देण्यात आले आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार, तर काही जिल्ह्यांत अतिवृष्टी होत आहे. नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, ठाण्यासह इतर जिल्ह्यांत जोरदार पाऊस सुरू असताना, कोल्हापूरवर मात्र पावसाची अवकृपा झाली होती.

मात्र, आज जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावून पिकांना उभारी दिली आहे. शहरातील खेळांच्या मैदानांमध्ये काही वेळातच पाणी साचून राहिले. सायंकाळी पाचनंतर कोल्हापूरच्या पश्‍चिम दिशेकडून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आधी जोराचा वारा आणि त्यानंतर येणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

शाळा सुटण्याच्या वेळेसच पाऊस सुरू झाल्याने विद्यार्थांनी शाळेतच राहणे पसंत केले. हातकणंगले, पुलाची शिरोली, तावडे हॉटेल, कसबा बावडा, शिये, कोल्हापूर शहर आणि त्यानंतर करवीर, गगनबावडा, गडहिंग्लज तालुक्यात टप्प्याटप्प्याने झालेल्या पावसाने सगळीकडे पाणीचपाणी झाले. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला आहे.

शेतकऱ्यांना दिलासा

जिल्ह्यात भात, भुईमूग, सोयाबीनसह फळ व पालेभाज्यांना मोठ्या पावसाची गरज होती. या पिकांवर खोड अळी, तांबेरा, पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. पिकांवरील रोग आणि कीड घालवण्यासाठी मुसळधार पावसाची प्रतीक्षा केली जात होती. आजच्या पावसाने काही प्रमाणात का असेना दिलासा मिळाला आहे.

मंडळांच्या कार्यकर्त्यांची धावपळ

अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे गणेश मंडळावरील पत्रे किंवा कागद उडून जाऊ नये यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. काही मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उभारलेल्या स्टेज व लाइटिंगचे नुकसान झाले. पावसामुळे कोल्हापूर शहरातील देखावे पाहण्यासाठी गर्दीही कमी झाली.

आजपासून पावसाचा अंदाज

गुरुवारी (ता. २८) अनंत चतुर्दशी व त्यानंतर काही दिवस मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला. यामुळे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पाणी फिरू शकते. मात्र, शेतीसाठी हा पाऊस दिलासादायक असणार आहे.

  • - गटारे, नाले तुडुंब भरून वाहू लागले

  • - रस्त्यांवर पाणीच पाणी

  • - खेळांच्या मैदानांना तळ्याचे स्वरूप

  • - गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची धावपळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT