Honorarium of senior players demand for Increase in honorarium of Hind Kesari wrestler to government 
कोल्हापूर

उतारवयात मागे लागली साडेसाती : वयोवृद्ध खेळाडूंना करावे लागते यासाठी वेटिंग!

संदीप खांडेकर

कोल्हापूर : वयोवृद्ध खेळाडूंना मानधनासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या पायऱ्या झिजवण्याची वेळ संपलेली नाही. ऑक्‍टोबर २०१९ पासून त्यांच्या हाती मानधनाची दमडी पडलेली नाही. उतारवयात त्यांच्या मागे लागलेली साडेसाती थांबण्याची चिन्हे नाहीत. याआधी ही शासनाकडून त्यांना प्रत्येक महिन्याकाठी मानधन मिळालेले नाही.

 
वयोवृद्ध खेळाडूंना १९९३ च्या शासन निर्णयानुसार मानधन देण्याची योजना सुरू झाली. संबंधित खेळाडूच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीलाही त्याचा लाभ मिळतो. २००१ च्या शासन निर्णयानुसार पैलवानांच्या मानधनात वाढ केली. पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, रुस्तम-ए-हिंद दादू चौगले, अर्जुन पुरस्कार प्राप्त शैलजा साळोखे, माजी ऑलिंपियन बंडू पाटील-रेठरेकर, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग, भारती पांडुरंग सुतार, आक्काताई शिवाजी मोरे, सुनंदा कृष्णराव माणगावे, हिंदकेसरी विनोद चौगले, रंगराव महिपती चव्हाण, चंद्रकला आनंदराव मोरे हे मानधनाचे मानकरी आहेत. यातील श्री. आंदळकर व श्री. चौगुले यांचे निधन झाले असून, त्यांच्या वारसदारांनाही मानधन वेळेवर मिळत नसल्याचा अनुभव 
येत आहे.


सहा महिने अथवा दहा महिन्यांचे एकत्रित मानधन या वयोवृद्ध खेळाडू व त्यांच्या कुटुंबीयांच्या हाती टेकवले जाते. वस्तुतः उतारवयातील खेळाडूंना औषधोपचार व आहारासाठी महिन्याकाठी मानधन मिळणे आवश्‍यक असते. मात्र, त्याकडे कोणीच लक्ष देत नाही. जिल्हा क्रीडा कार्यालयात जाऊन मानधन आले का, अशी विचारणा करण्याची वेळ या खेळाडूंवर येते. संचारबंदीच्या काळात या खेळाडूंना मानधनाची आवश्‍यकता असताना ते मिळालेले नाही. गेल्या सप्टेंबरमध्ये त्यांना मानधन दिले होते.हिंदकेसरी व महाराष्ट्र केसरी वयोवृद्ध खेळाडूंना प्रत्येकी सहा हजार रुपये, आंतरराष्ट्रीय खेळाडूंना चार हजार तर राष्ट्रीय खेळाडू अडीच हजार रुपये मानधन महिन्याकाठी दिले जाते.  लागलेली साडेसाती थांबण्याची चिन्हे नाहीत. याआधी ही शासनाकडून त्यांना प्रत्येक महिन्याकाठी मानधन मिळालेले नाही. 

जिल्ह्यात तीन मंत्री, दोन खासदार, दहा आमदार आहेत. वयोवृद्ध खेळाडूंचे मानधन महिन्याला मिळावे, यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. हिंदकेसरी पैलवानांच्या मानधनात वाढ करण्याचा मुद्दाही त्यांनी विचारात घ्यावा. एकत्रित मानधन देण्याचा पर्याय योग्य नाही.
- दीनानाथसिंह, हिंदकेसरी.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT