hotel dhaba full due to adhik maas sharavan month kolhapur esakal
कोल्हापूर

Adhik Maas 2023 : अधिक श्रावण मास उद्यापासून, कोल्हापूरकरांची हॉटेल्ससह ढाब्यांवर तोबा गर्दी; मांसाहारावर येणार मर्यादा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : आषाढातली गटारी अमावास्या आज (ता. १७) खवय्यांनी मांसाहारावर ताव मारला. मंगळवारपासून (ता. १८) अधिक श्रावण मास सुरू होत असून, या मासात मांसाहार वर्ज्य आहे. परिणामी, सकाळपासून मटणाच्या दुकानांकडे खवय्यांची पावले वळाली. रात्री हॉटेल्ससह ढाब्यांवर खवय्यांची गर्दी होती.

कोल्हापूरकर म्हटले, तांबडा-पांढरा रस्सा, हे समीकरण नवे राहिले नाही. बुधवार व रविवारी हमखास मटण, चिकन, मासे खाणारा इथला खवय्या आहे. त्र्यंबोली यात्रेच्या निमित्ताने मटणाचा वाटा मांसाहारी खवय्यांच्या घरी शिजला. येत्या मंगळवारपासून श्रावण मास सुरू होत असल्याने मांसाहार करण्यावर मर्यादा येणार आहे, याचे भान ठेवून खवय्यांनी आजच मटण खाण्याचा आनंद घेतला.

उद्या (सोमवार) गटारी अर्थात गतहारी अमावास्या आहे. दीप अमावास्या म्हणून ती वर्षानुवर्षे साजरी केली जात असली तरी गतहारीचे अपभ्रंश होऊन ती गटारी झाली आहे. सोमवारी अनेक जण मांसाहार वर्ज्य करत असल्याने त्यांनी सकाळपासूनच मटणांच्या दुकानांसमोर रांग लावली. मटणाचा दर कितीही असो, त्याचा विचार न करता त्यांच्याकडून खरेदी होत होती.

चिकन व मासेही खरेदी केले जात होते. दुपारीच काहींच्या घरी मांसाहारावर ताव मारण्यात आला. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रात्री हॉटेलवर जाण्याचा बेतही दुपारीच आखला. काही जण थेट त्यांच्या फार्महाऊस, रिसॉर्टवर मित्रांसमवेत गटारी साजरी करण्यासाठी गेले.

दीप अमावास्या म्हणजे काय?

दीप अमावास्या अर्थात गटारी अमावास्या उद्या (ता. १७) आहे. या अमावस्येला सुवासिनी घरातील सर्व दिवे, निरांजन व समई स्वच्छ करतात. त्याभोवती रांगोळी काढून त्यांची पूजा करतात. पूरण अथवा गूळ घालून उकडलेले दिव्यांचा त्याला नैवेद्य दाखवतात. कणकेचा दिवा करून त्यात तुपाची वात घातली जाते. तो दिवा देवापुढे ठेवला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT