The hotel will start, but not enough staff 
कोल्हापूर

हॉटेल सुरू होणार, मात्र पुरेसे कर्मचारी नाहीत

मोहन मेस्त्री

कोल्हापूर : सहा महिन्यानंतर शासनाने हॉटेल चालू करण्यासाठी परवानगी दिली असली तरीदेखील वेटर व्यवस्थापन आणि किचन कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेशिवाय हॉटेल शंभर टक्के सुरू होणे अशक्‍य आहे. दरम्यान, ज्यांची रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्याची तयारी आहे. त्यांचे सोमवारी (ता.5) पासून व्यवसाय सुरू होतील. हॉटेल सुरू होणार असल्यामुळे खवय्ये कोल्हापूरकर मात्र काहीसे सुखावले आहेत. 
प्रशासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याकरिता बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. ग्राहक आणि कर्मचारी यांच्या आरोग्याबाबत सर्व दक्षता घेऊनच शहरातील हॉटेल व्यवसाय सुरू होतील, असा सूर आज हॉटेल मालक संघटनेच्या हॉटेल पॅव्हेलियन येथे झालेल्या बैठकीत उमटला. 
या बैठकीत आरोग्यविषयक सुरक्षिततेसाठी डॉक्‍टरांचेही मार्गदर्शन घेण्यात आले. वेटर आणि किचनमधील कर्मचाऱ्यांनी फेस शिल्ड, मास्क वापर करावा आणि दर तीन तासांनी संपूर्ण हॉटेलचे सॅनिटायझेशन करावे, दिवसातून तीन वेळा कर्मचाऱ्यांचा ताप आणि ऑक्‍सिजन पातळी तपासणी गरजेची असल्याचे डॉ. रूपाली कपाले यांनी सांगितले. शासनाच्या नियमानुसार सोशल डिस्टंन्सचा अवलंब करण्यासाठी रेस्टॉरंटमधील फर्निचर व्यवस्थेमध्ये बदल करावा लागणार असल्याने बार आणि रेस्टॉरंट चालू करण्यात वेळ लागणार असल्याचे अनेक व्यावसायिकांनी सांगितले. तसेच अनेकांचे हॉटेल कामगार गावी गेले आहेत. ते परतल्याशिवाय पूर्ण क्षमतेने व्यवसाय सुरू करणे अशक्‍य आहे, असे काही व्यावसायिकांनी सांगितले. 
या बैठकीस उज्ज्वल नागेशकर, सचिन शानबाग, आशिष रायबागे, मोहन पाटील, अरुण चोपदार, सिध्दार्थ लाटकर, आनंद माने, बाबा जगदाळे आदिंसह शहरातील अनेक हॉटेल व्यवसायिक उपस्थित होते. 

या नियमांचे पालन करावे लागणार 
-सर्व ग्राहकांच्या शरीराचे तापमान तपासणे, 
- तापमान 100 पेक्षा जास्त असेल तर प्रवेश नाकारावा, 
- हॅड सॅनिटायझरचा वापर सतत करावा, 
-बुफे जेवणास परवानगी नाही 
- वेटरना मास्क फेसशिल्ड असावेत, 
- दोन टेबलमध्ये एक मीटरचे अंतर असावे, 
सीसीटिव्ही चालू असणे बंधनकारक आहे

-संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Squad IPL 2025: मुंबई इंडियन्सचा संघ दिसतोय तगडा, RCB च्या स्टार खेळाडूला सोबत घेऊन मारली बाजी

IND vs AUS : लपक-झपक... Dhruv Jurel चा अविश्वसनीय झेल, ऑस्ट्रेलियन फलंदाजही स्तब्ध, Video viral

IPL 2025 Auction Live: एकाच डावात १० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजासाठी चेन्नई-मुंबईमध्ये चढाओढ! कोण आहे Anshul Kamboj?

Beed News: पत्नीला अर्धांगवायू झाल्याचे समजताच पतीचा हृदयविकाराने मृत्यू; अंबडमध्ये धक्कादायक घटना

फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास शिंदेंसाठी भाजपचा 'प्लॅन बी' तयार, दिल्लीत हालचाली वाढल्या!

SCROLL FOR NEXT