Ichalkaranji is becoming center of drug racket ganja in Kolhapur from miraj Sakal
कोल्हापूर

Kolhapur News : सीमाभागातून मिरजमार्गे गांजा कोल्हापुरात; इचलकरंजी बनतेय रॅकेटचे केंद्र

मार्च महिन्यात राष्ट्रीय महामार्गालगत पेठवडगावच्या हद्दीत एका हॉटेलच्या पिछाडीस कामगारांच्या खोलीवर पोलिसांनी छापा टाकला होता.

सकाळ वृत्तसेवा

- गौरव डोंगरे

Kolhapur News : सीमाभागातील चिक्कोडी, निपाणी, गळदगामार्गे गांजा मिरजेत आणला जातो. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या सीमाभागात अमली पदार्थांच्या तस्करांकडून रेल्वे, बसेसमधूनही याची वाहतूक केली जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी हे गांजा रॅकेटचे केंद्र बनले असून, मूळ ठिकाणी विक्री होणाऱ्या किमतीच्या चौपट फायदा मिळवत तस्करांनी गुन्हेगारीतही बस्तान मांडले आहे.

यापूर्वी कोल्हापूर पोलिसांनी गांजा रॅकेटचा माग काढत जत, आडपाडीसह ओरिसा, राजस्थानपर्यंतचे जाळे शोधले होते. पुन्हा अशाच कारवाईची अपेक्षा सर्वसामान्य कोल्हापूरकर व्यक्त करत आहेत.

कोठेही उपलब्ध होणारा गुटखा, गांजाच्या सेवनासह ‘फुलचंद’, ‘डबल रिमझिमची’ चलती आहे. पानटपरीवरून गुटखा, माव्याची पुडी उचलायची अन् निर्जनस्थळ, उद्याने, मोकळे माळ गाठायचे. हळूहळू कागदाचे रोल हाताने वळत त्यात गांजा भरून झुरक्यांना सुरुवात करायची. जाधववाडी, उचगाव पूल, सरनोबतवाडीसह महामार्गालगतही आता गांजा विक्रीचे पेव फुटले आहे.

महामार्गालगत गांजाचा बाजार

मार्च महिन्यात राष्ट्रीय महामार्गालगत पेठवडगावच्या हद्दीत एका हॉटेलच्या पिछाडीस कामगारांच्या खोलीवर पोलिसांनी छापा टाकला होता. मूळचा राजस्थानचा असणारा मोहनराम हा ट्रकचालकांना गांजा, अफूसारखे अमली पदार्थ पुरवत असल्याचे समोर आले. तासन्‌तास वाहने चालविण्यासाठी चालक अशा अमली पदार्थांच्या गुंगीत राहतात, अशी धक्कादायक माहिती यानिमित्ताने समोर आली होती.

भाज्यांच्या वाहनांतूनही वाहतूक

शिरोळचा सीमाभाग बाजूच्या राज्यांच्या हद्दीतून गांजाची आवक करणारा महत्त्वाचा दुवा ठरत आहे. भाज्यांच्या वाहनातून छुप्या पद्धतीने गांजा जिल्ह्यात आणला जात आहे. कुरुंदवाड, जयसिंगपूर या बाजारपेठांच्या ठिकाणांहून गांजा पुढे नेला जात असल्याचे स्थानिक सांगतात. परराज्यातून येणाऱ्या रेल्वेमधूनही मिरजेत येणाऱ्या गांजाचे रॅकेटही इचलकरंजी, सांगलीत काही दिवसांपूर्वी झालेल्या कारवायांतून उघड झाले आहे.

जाधववाडीत भरदुपारीच पोरं तर्रर्रर्र....

जाधववाडी उद्यानात काही मुले दिवसरात्र गांजाचे झुरके ओढण्यासाठी जमतात. सकाळी दहा वाजताच या मुलांचा घोळका एकत्रित येतो. इथे गांजाच्या नशेत असणाऱ्या मुलांना हटकण्याचे धाडसही कोणी करू शकत नाही.

पेरूच्या फोडींना गांजाची गोडी

महाद्वार रोडवर केळी, पेरू विकणाऱ्या एका तरुणाने भागातील मुलांना पुड्या देण्याचा धंदा मांडला होता. काही महिन्यांपूर्वीपर्यंत त्याच्याकडे येणाऱ्या विशिष्ट गिऱ्हाईकाला पेरूच्या फोडीसोबत ही पुडी देऊन त्याचे १०० रुपये तो घेत होता. येथील फेरीवाल्यांनी हा प्रकार पाहून पोलिसांना माहिती कळवली होती, पण यानंतर गायब झालेला हा तरुण आता पुन्हा ताराबाई रोडवर दिसू लागला आहे.

तुमच्या भागातील माहिती कळवा....

शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत गांजासह अमली पदार्थांचे सेवन करून हुल्लडबाजी करणाऱ्या टोळक्यांची दहशत वाढली आहे. पोलिसांच्या नजरेस न येणाऱ्या ठिकाणी असे प्रकार करणाऱ्यांना आळा बसावा यासाठी ‘सकाळ’ने ‘नशेबाजीचा बाजार’ ही मालिका चालविली आहे. आपल्या भागात असे प्रकार घडत असल्यास त्याची माहिती, छायाचित्रे ९१४६१९०१९१ या व्हॉटसॲप क्रमांकवर कळवा. माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT