Ichalkaranji Sulkud Yojana Action Committee Eknath Shinde esakal
कोल्हापूर

मुख्यमंत्री शिंदेंना कृती समिती दाखविणार काळे झेंडे; खासदार माने, आमदार आवाडेंनाही धरलं धारेवर

आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करुन खासदार धैर्यशील माने व आमदार आवाडे यांनी नागरिकांची फसवणूक केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

आमदार आवाडे यांनी कृती समितीवर बिनकामाची टोळी असल्याची टीका केली होती. त्याला जोरदार प्रत्युत्तर या बैठकीत देण्यात आले.

इचलकरंजी : ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आपल्या गावी शेतात जाऊन काम करण्यास वेळ आहे; पण इचलकरंजीच्या जिव्हाळ्याच्या सुळकूड योजनेच्या पाणी प्रश्नावर बैठक घेण्यास वेळ नाही. त्याच्या निषेधार्थ आगामी इचलकरंजी दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय इचलकरंजी सुळकूड योजना कृती समितीच्या (Ichalkaranji Sulkud Yojana Action Committee) बैठकीत घेण्यात आला. समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात समितीची व्यापक बैठक घेण्यात आली.

यावेळी खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) व आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांच्यावर कठोर शब्दांत टीका करण्यात आली. इचलकरंजी शहरासाठी मंजूर झालेल्या सुळकूड योजना सुरू करण्याच्या प्रश्नावर शासन पातळीवर बैठक होणार होती. मात्र, त्याबाबत हालचाली पूर्णतः बंद आहेत. त्यामुळे याप्रश्नी पुन्हा एकदा लढा उभारण्यासाठी आज बैठक पार पडली. निमंत्रक प्रताप होगाडे यांनी पुढील लढ्याची दिशा यावेळी जाहीर केली.

कृती समितीमध्ये सत्ताधारी आता सोबत नसल्याचे निदर्शनास आणून देत यापुढे पुन्हा एकदा विभागवार बैठका घेवून जनजागृती केली जाईल. महिन्याभराच्या वाटचालीनंतर २५ हजार लोक रस्त्यावर उतरतील, अशी परिस्थीती निर्माण केली जाईल, असे त्यांनी यावेळी जाहीर केले. आमदार आवाडे यांनी कृती समितीवर बिनकामाची टोळी असल्याची टीका केली होती. त्याला जोरदार प्रत्युत्तर या बैठकीत देण्यात आले. ‘हीच टोळी तुम्हाला निवडून आणत होती आणि आता ती पाडूही शकते’, असा इशारा होगाडे यांनी दिला.

Ichalkaranji Sulkud Yojana Action Committee

‘विधानसभा निवडणुकीत यातील तुमच्यासोबत काहीजण होते, त्यावेळी तुम्ही टोळीप्रमुख होता काय’, असा सवाल शशांक बावचकर यांनी उपस्थित केला. ‘भाजपच्या संगतीमुळे टोळी असा ते असंविधानिक शब्द वापरत आहेत’, अशी टीकाही त्यांनी केली. ‘पाणी प्रश्नावर बैठक घेण्याचे सांगून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करुन खासदार धैर्यशील माने व आमदार आवाडे यांनी नागरिकांची फसवणूक केली आहे. आम्ही जर टोळीवाले आहोत, तर मग तुम्हाला दरोडेखोर म्हणायचे काय’, असा संतप्त सवाल कारंडे यांनी यावेळी उपस्थित करीत तुमचा इतिहास काढला तर तुमची अडचण होईल, अशा इशाराही दिला. ‘इचलकरंजीने दिलेल्या बहुमताची जाण खासदार माने यांनी ठेवावी’, अशी रोखठोक भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

यावेळी राहुल खंजिरे, नितीन जांभळे, सयाजी चव्हाण, पुंडलिक जाधव, भरमा कांबळे, प्रकाश मोरबाळे, सदा मलाबादे, अभिजीत पटवा, सावित्री हजारे, विकास चौगुले, राहुल सातपुते, शशिकांत देसाई, शिवाजी साळुंखे, सुनिी बारवाडे, नूरमहमंद बेळकूडे, अमृत भाटले, मनोहर जोशी, डॉ. अरुण पाटील, माधुरी सातपुते, राजू कोन्नूर, प्रताप पाटील, सुरेश गणबावडे, रघुनाथ जमदाडे, संजय डाके, बजरंग लोणारी, दौलत पाटील आदींनी भूमिका मांडल्या. प्रास्ताविक प्रसाद कुलकर्णी यांनी केले.

रमेश पाटील यांचे सोमवारपासून उपोषण

सुळकूड योजनेची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी सोमवार (ता.१२) पासून प्रांत कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे रमेश पाटील यांनी बैठकीत जाहीर केले. तर शासनाकडे जमा होणारा विविध महसूल थांबविण्याच्या सूचनाही यावेळी विविध वक्त्यांनी केल्या.

९० टक्के आजार पाण्यामुळे

‘शहरातील नागरिकांना ९० टक्के आजार हे पाण्यामुळे होत आहेत’, अशी माहिती डॉ. अरुण पाटील यांनी यावेळी दिली. शहरवासीयांना दूषित पाणी दिले जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT