कोल्हापूर

अतिरीक्त जिल्हा न्यायालय इमारत उदघाटन

नवजीवन हायस्कूलच्या विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

सकाळ वृत्तसेवा

जयसिंगपूर : अतिरिक्त जिल्हा न्यायालयाची सुसज्ज इमारत पूर्ण झाली असून आधुनिकीकरणामुळे न्यायदान करणे सोयीचे होणार आहे. सध्या आधुनिक साधनांचा वापर करून प्रभावीपणे न्यायदान होऊ शकते. त्यामुळे न्यायालयातील गर्दी व विलंब टाळता येतो, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजेय गडकरी यांनी व्यक्त केले. येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालय विस्तारीत इमारतीच्या उद्‍घाटनानंतर मराठा मंडळाच्या हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रधान जिल्हा न्यायाधीश वृषाली जोशी अध्यक्षस्थानी होत्या. नवजीवन हायस्कूलच्या विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

माजी आमदार उल्हास पाटील यांच्या प्रयत्नातून येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालय वरिष्ठ न्यायालय व प्रथम वर्ग न्यायालय अशी न्यायालये एकाच छताखाली येण्याकरीता ४ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर झाला होता. न्यायमूर्ती श्री. गडकरी यांनी माजी आमदार उल्हास पाटील यांच्या कार्याची प्रशंसा करत नव्या इमारतीत गतीने न्यायदानाचे काम चालावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार उल्हास पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आ. पा. कानडे, महाराष्ट्र-गोवा कौन्सिलचे विवेक घाटगे, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष गिरीष खडके यांच्यासह वकील, पक्षकार व कर्मचारी उपस्थित होते. अ‍ॅड. स्वानंद कुलकर्णी, अ‍ॅड. उषा पाटील, अ‍ॅड. राहुल कट्टी यांनी सूत्रसंचालन केले. जयसिंगपूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. तारक अत्तार यांनी स्वागत केले. कुरूंदवाड बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. एन. डी. बागवान यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT