Former soldier Namdev Patil esakal
कोल्हापूर

जंगलात बेछूट गोळीबार, हल्ल्यात पायांना लागल्या गोळ्या, तरीही दहशतवाद्यांना संपवलं; माजी सैनिकानं सांगितला 1994 चा थरार

'देशाच्या संरक्षणासाठी आम्ही कशाचीच पर्वा केली नाही.'

संदीप खांडेकर

'दहशतवाद्यांविरूद्ध केलेल्या कामगिरीची दखल घेऊन मला मेडलही मिळाली. एकूण मला सात मेडल्सही मिळाली आहेत.'

कोल्हापूर : ‘तो’ दिवस २७ एप्रिल १९९४ चा. श्रीनगरमधील अनंतनागपासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर छत्रगुरू जंगल. तेथे लपलेल्या दहशतवाद्यांच्या (Terrorists) शोधात होतो. अचानक त्यांच्याकडून गोळीबार झाला. त्यातील एकाला मी मारले, तर दोघे जखमी झाले. गोळीबारात माझ्या दोन्ही पायांना गोळ्या लागल्या. त्यापेक्षा मी एका दहशतवाद्याला मारल्याचा मला आनंद होता, करवीर तालुक्यातील गिरगावचे माजी सैनिक नामदेव महादेव पाटील सांगत होते.

त्यांचे (Namdev Mahadev Patil) सहकारी जवान ग्वाल्हेरचे अमरसिंग याच्या खांद्याला दोन व काखेखाली एक गोळी लागली. पाटील यांना जंगलातून अनंतनाग येथे आणले. तेथून विमानाने श्रीनगरच्या रूग्णालयात हलविले. तीन महिने ते रूग्णालयात होते. गुडघ्याची वाटी निकामी झाली. तेथून ते घरी परतले. दोन-तीन वर्षे त्यांना चालता येत नव्हते. कधीतरी जनावरे चारायला नेण्याचे काम त्यांनी केले.

श्रीलंकेत पाठविलेल्या शांतीसेनेतही ते होते. दोन वर्षे त्यांचे श्रीलंकेत वास्तव्य होते. ते ज्या ठिकाणी राहत होते, तिथल्या प्रवेशद्वाराबाहेर पडल्यानंतर जिवंत परत येईन की नाही, याची शाश्‍वती नसल्याचे ते सांगतात. प्रभाकरनचा साथीदार थुमन याने सैन्यावर गोळीबार केला होता. त्याला महिनाभरात त्यांनी मारले होते.

सुमारे वीस गोळ्या त्याला लागल्याचे ते स्पष्ट करतात. ते म्हणाले, ‘अयोध्येतील सागर येथेही आम्ही होतो. पुढे श्रीनगरच्या राष्ट्रीय रायफल्समध्ये आमचा सहभाग होता. दहशतवाद्यांविरूद्ध केलेल्या कामगिरीची दखल घेऊन मला मेडलही मिळाली. एकूण मला सात मेडल्सही मिळाली आहेत. देशाच्या संरक्षणासाठी आम्ही कशाचीच पर्वा केली नाही ’

लेड लडाख, पूंज बॉर्डवर बजावली सेवा

पाटील यांचे शिक्षण नववीपर्यंतचे. कसबा वाळवा येथील रघुनाथ इंग्लिश मीडियमचे ते विद्यार्थी. ते १९ मार्च १९७६ला फर्स्ट मराठा जंगी पलटणमध्ये दाखल झाले. लेड लडाखमध्ये दीड वर्षे सेवा बजावल्यानंतर ते भारत-पाकिस्तानच्या पूंज येथील बॉर्डवर एक वर्ष होते. पुढे रोडकी, पलानवाला आणि त्यानंतर थेट शांतीसेनेत ते होते.

माजी सैनिकांचे तरूणाईला मार्गदर्शन

सैनिकांचे गाव म्हणून गिरगावची ओळख आहे. सैन्यात भरती होऊन देशसेवा करणे, हे इथल्या तरूणाईचे ध्येय असते. आजही गावातील तरूणाई सैन्य भरतीसाठी कठोर परिश्रम घेते. गावात अनेक माजी सैनिक आहेत. पाटील यांच्यासह अन्य माजी सैनिक त्यांना मार्गदर्शन करण्यात मागे राहत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT