Indian Jawan Yogesh Dattwade Died esakal
कोल्हापूर

Indian Jawan : सुटीवर आलेल्या जवानावर काळाचा घाला; थांबलेल्या ट्रकच्या धडकेत जवान जागीच ठार

सकाळ डिजिटल टीम

रात्री दहाला जेवण करून परत येत असताना व पाऊस सुरू असल्याने घसरून निपाणी राष्ट्रीय महामार्गावर चव्हाण मळ्याजवळ थांबलेल्या ट्रकवर योगेशची मोटारसायकल धडकली. यात तो जागीच ठार झाला.

खडकलाट : आसाम येथे १० मद्रास बटालियनमध्ये (Madras Battalion) सेवा बजावत असलेला व चार दिवसांपूर्वी सुटीवर आलेला नवलिहाळ येथील जवान (Indian Army) अपघातात मृत्यू झाला. योगेश आप्पासाहेब दत्तवाडे (वय २४, रा. नवलिहाळ, ता‌‌. चिक्कोडी) असे मृत जवानाचे नाव आहे.

निपाणी येथील चव्हाण मळ्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर (ता. २८) रात्री दहाला हा अपघात झाला. योगेश आप्पासाहेब दत्तवाडे याचे मूळगाव तपकारवाडी असले तरी लहानपणीच वडील वारल्यामुळे आपल्या आईसोबत आपला मामा काकासाहेब खड्ड (रा. नवलिहाळ) यांच्याकडे रहात होता.

दहावीपर्यंतचे शिक्षण नवलिहाळ येथे, तर आयटीआय चिक्कोडी येथे पूर्ण केल्यानंतर चार वर्षांपूर्वी आसाम १० मद्रास बटालियनमध्ये जवान म्हणून रुजू झाला होता. चार दिवसांपूर्वीच तो सुटीवर आला होता. बुधवारी सायंकाळी आपल्या मित्रांसोबत मोटारसायकलवरुन निपाणीस गेला होता.

रात्री दहाला जेवण करून परत येत असताना व पाऊस सुरू असल्याने घसरून निपाणी राष्ट्रीय महामार्गावर चव्हाण मळ्याजवळ थांबलेल्या ट्रकवर योगेशची मोटारसायकल धडकली. यात तो जागीच ठार झाला. निपाणी शहर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षका उमादेवी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. गुरुवारी उत्तरीय तपासणी केल्यानंतर नवलिहाळ येथे सायंकाळी पाचला योगेश याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी योगेश जवान म्हणून कर्तव्य बजावत असलेल्या बटालियनमधील अधिकारी, सहकारी जवान, चिक्कोडीचे तहसीलदार सी. एस. कुलकर्णी, नवलिहाळ येथील ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, येथील पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक बी. डी. कोतवाल, पोलिस कर्मचारी, यांच्यासह नवलिहाळ उपस्थित होते. योगेश याच्या मागे आई, बहीण, मामा, मामी असा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Live Updates : मविआच्या बैठकीनंतर नेते शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल

Swine Flu: महाराष्ट्रात स्वाईन फ्लूचा धोका वाढला; मलेरियानेही डोकं वर काढलं

Nitish Kumar Reddy, रिंकू सिंगची तुफान फटकेबाजी; भारताने बांगलादेशविरुद्ध उभारला द्विशतकीय डोंगर

PM Modi: फोर्टिफाईड तांदळाचं देशभरात होणार मोफत वितरण; केंद्र सरकारचा निर्णय, १७ हजार कोटींचा खर्च

INDW vs SLW : Smriti Mandhana, हरमनप्रीत कौरची वादळी खेळी; शफाली वर्माची फटकेबाजी, वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम धावसंख्या

SCROLL FOR NEXT