कोल्हापूर

उद्योग, बॅंका, खासगी कार्यालये शंभर टक्के बंद; जिल्हाधिकारी दौलत देसाई

सुनील पाटील

कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. कोरोनाने मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता.१५) रात्री 12 ते रविवार (ता. 23) रात्री १२ पर्यंत कडक लॉकडाऊन  जाहीर करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमध्ये दूध वितरण व विक्री, अत्यावश्यक सेवा, औषध दुकाने सुरू राहतील. तर, एमआयडीसी भाजी मंडई सह इतर सर्व कार्यालय कडकडीत बंद राहतील अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिल्या आहेत.

Industrie banks private offices are one hundred percent closed lockdown update marathi kolhapur news

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. ही बाब चिंताजनक आहे. जिल्ह्यातील कोरोना साखळी तोडायची असेल तर लॉकडाउन करावे लागेल, अशी मागणीही काल जिल्हाधिकारी कार्यालय झालेल्या बैठकीवेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्याकडे सर्व आमदारांनी केली. या मागणीनुसारच शनिवारपासून होणाऱ्या लॉक डाऊन चे नियोजन करण्यात आले आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान शनिवार पासून होत अ सलेल्या लॉकडाऊन मध्ये एमटीडीसी बंद ठेवली जाणार आहे. भाजी मंडई बंद ठेवून घरपोच भाजी विक्री करता येणार आहे. याशिवाय खासगी कार्यालये, बँक ही बंद राहातील.

 हे सुरू रहाणार

 0)दूध ,भाजीपाला व गॅस घरपोच सेवा सकाली ६ ते १० व दुपारी चार ते सायंकाळी ७  (घरपोच वितरण)

०) दूध संकलन ,वाहतूक व वितरण व्यवस्था 

०) सर्व वैद्यकीय सुविधा, औषध दुकाने,वैद्यकीय सुविधेसाठी सर्व उत्पादने

०) शेतीशी निगडीत व मान्सून पूर्व कामे

०) पेटोल-डिझेल विक्री व वाहतूक

०) कायदा व सुव्यवस्थेसाठी लागणारी सर्व शासकीय कार्यालये

०) एटीएम, पोस्ट कार्यालये, 

०)प्रसारमाध्यमे, र्वृत्तपत्र कार्यालय, वितरण

०) सर्व प्रकारची माल वाहतूक

हे बंद राहणार

बॅंका बंद राहणार

सर्व उद्योग, व्यापार, अस्थापना, कार्यालये

इतर अस्थापना, व सेवा पुरविणारे घटक - व्यवसाय

कोल्हापुरात येणाऱ्यांसाठीचे नियम

आरटीपीसीआर चाचणी ४८ तासांच्या आतील बंधनकारक

मालवाहतूक करऱ्यांमध्ये दोन पेक्षा जादा -चालक व क्लिनर यांनाच परवानगी

Industrie banks private offices are one hundred percent closed lockdown update marathi kolhapur news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Islamic Country: 'या' मुस्लिम देशात भारतीय लोक खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी; जाणून घ्या कारण

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Astro Tips : नव्या जोडप्याची बेडरूम कोणत्या दिशेला असावी? दोघांमध्ये कलह होत असतील तर...

SCROLL FOR NEXT