कोल्हापूर : महापालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या तिन्ही लाटेत रुग्णांवर उपचार झाले. यात या ठिकाणी सुमारे ५० रुग्ण हे हाय रिस्कमधील होते. त्यांना व्हेंटिलेटर लावला होता. मात्र, येथील डॉक्टरांच्या उपचारांमुळे त्यांना जीवदान मिळाले. शहरातील सर्वसामान्य नागरिकांना कोरोना काळात आयसोलेशन हॉस्पिटल आधार बनले.
सरकारी रुग्णालये म्हणजे गैरसोय असे चुकीचे समीकरण समाजात रूढ झाले आहे. मात्र, कोरोना काळात याच शासकीय रुग्णालयांची आवश्यकता सर्वांच्याच लक्षात आली. कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेत शहरातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढली. आयसोलेशन हॉस्पिटलमधील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन येथे २ मजलेही वाढवले.
ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटरची सुविधाही उपलब्ध करून दिली. तिन्ही लाटेत येथे सुमारे ५० रुग्ण हाय रिस्कचे होते. त्यांना सातत्याने व्हेंटिलेटर लावला होता. येथील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नामुळे हे रुग्ण बरे झाले. यातील बहुतांशी रुग्णांची आर्थिक स्थिती बेताची होती. खासगी रुग्णालयातील महागडे उपचार त्यांना परवडणारे नव्हते. अशा काळात आयसोलेशन रुग्णालय त्यांच्यासाठी आधारभूत ठरले असून, अत्यल्प खर्चामध्ये त्यांना सर्वोत्तम उपचार मिळाले. रुग्णांना उपचारांबरोबरच पौष्टिक आहारही दिला. येथे तीन वर्षांत १ हजार ८२६ रुग्णांवर उपचार झाले.
आरोग्य विभाग सज्ज
कोरोनाकाळात आरोग्य विभागाला अधिक निधी
आरोग्य यंत्रणा अद्ययावत करण्यास मदत
आयसोलेशन रुग्णालयात २ नवे मजले
नवे ७२ बेड, ५२ ऑक्सिजन बेड, ७ व्हेंटिलेटर बेड
लहान मुलांचा १ व्हेंटिलेटर
सावित्रीबाई फुले रुग्णालयात नवी २ ऑपरेशन थिएटर
सावित्रीबाई फुले रुग्णालयाला ८० लाखांचा निधी
पंचगंगा रुग्णालयाला २० लाखांचा निधी
महापालिकेची सर्वच रुग्णालये आणि कोविड सेंटरमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील रुग्ण मोठ्या संख्येने यायचे. यावेळी त्यांना तातडीने उपचार दिले. प्रभावी उपचारांमुळे येथून बरे होऊन जाण्याऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. कोरोना काळात महापालिकेच्या आरोग्य विभागाने उपलब्ध साधनांमध्ये अत्यंत चांगले काम केले आहे.
- जयवंत पवार, आरोग्य अधिकारी, महापालिका
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.