लॉकडाउनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि ते निराशेच्या गर्तेत अडकले.
कोल्हापूर : इंजिनिअरिंगला जायचं आणि पुढे ‘आयटी’मध्ये करिअर (IT job) करण्याचा ट्रेंड म्हणून इंजिनिअरिंग केलं आणि बंगळूरला एका आयटी कंपनीत जॉबही मिळाला. सारं काही सुरळीत सुरू होतं. पण, आवड स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर चार वर्षांपूर्वी जॉब सोडायचा निर्णय घेतला आणि आर्चर आय फर्मची स्थापना केली. (advertising field career)
सुरवातीला संघर्ष जरूर होता. पण, आता जगभरातील नामांकित ब्रॅंडसच्या जाहिराती (advertising brands) तो साकारतो आहे आणि त्याला जगभरातून प्रतिसाद मिळतो आहे. जयसिंगपूरच्या परितोष पाटील याची ही यशकथा. लॉकडाउनच्या (lockdown) काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि ते निराशेच्या गर्तेत अडकले. पण, आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपण काही नवे करण्याचा संकल्प केल्यास त्यात नक्कीच यश मिळते, असाच संदेशही यशकथा देते.
परितोषने गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून असा निर्णय घेणे अनेकांना न पटणारे होते. त्यांनी त्याला त्याबाबत वारंवार सूचनाही केल्या. पण, त्यानं संकल्प सोडला नाही. अनेक अडचणींवर मात करत प्रवास सुरूच राहिला. वाढती स्पर्धा आणि जागतिकीकरणाच्या रेट्यात अनेक कंपन्यांना आपल्या जाहिराती करणे आवश्यक वाटू लागले आणि त्यातूनच मग कामाची संख्या वाढू लागली. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ब्रॅंडसच्या जाहिराती, माहितीपट परितोष आणि त्याच्या टीमनं साकारल्या आणि त्यांचा चांगला गाजावाजाही झाला. आता तर त्याची पहिली ऐतिहासिक शॉर्टफिल्म लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
सध्या परितोष आणि त्याची टीम मराठी व हिंदीतील अनेक अभिनेते, अभिनेत्री, तंत्रज्ञांबरोबर काम करत आहे. नॅशनल जिओग्राफीक, डिस्कव्हरी अशा जगभरातील मोठ्या ब्रॅंडबरोबर काम केलेल्या अनेक व्हाईसओव्हर आर्टिंस्टबरोबरही त्यांचे काम सुरू आहे.
सुरवातीच्या काळात एकट्याचा संघर्ष सुरू होता. कारण या क्षेत्रात काय भविष्य, असा अनेकांचा सवाल होता. पण, आता आमची पाच जणांची टीम आहे आणि प्रत्यक्ष शूटिंगवेळी किमान तीस जणांची टीम असते.
- परितोष पाटील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.