दादासाहेब सुर्वे sakal
कोल्हापूर

जपानमध्ये फडकला होता तिरंगा

पंधरा ऑगस्टच्या मध्यरात्री दादासाहेब सुर्वे यांना मिळाला होता बहुमान

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : पंधरा ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री मराठा बटालियन हमाडा जपानमध्ये तैनात होती. तेथे भारताचा तिरंगा ध्वज फडकवला गेला. यावेळी हमाडा येथे सजावट केली होती आणि भारताचा राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर आतषबाजीही केली. भारताचा राष्ट्रध्वज याप्रकारे भारतीय वेळेच्या आधी सुमारे साडेपाच तास जपानमध्ये फडकवला गेला आणि तो फडकवण्याचा मान भारतीय लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल दादासाहेब सुर्वे यांना मिळाला होता... भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना आता येथील संशोधक यशोधन जोशी यांच्या अभ्यासातून ही माहिती पुढे आली आहे.

यशोधन जोशी सांगतात, ‘‘१५ ऑगस्ट १९४७ ला भारतावर दीडशे वर्षे राज्य केलेल्या इंग्लंडचा युनियन जॅक खाली उतरवला गेला आणि भारताचा तिरंगा राष्ट्रध्वज तिथं डौलानं फडकायला लागला. त्याआधी मध्यरात्री तो स्वतंत्र भारताच्या विधिमंडळात फडकवला गेला होता आणि याच वेळी नेहरुंनी अनेक वर्षांपूर्वी आम्ही नियतीशी एक करार केला होता, हे प्रसिद्ध भाषण केलं होतं. इंडिया गेटजवळच्या प्रिन्सेस पार्कमध्ये जिथं नेहरुंनी राष्ट्रध्वज फडकवला, पहिल्यांदा राष्ट्रगीत गायलं गेलं आणि राष्ट्रध्वजाला ३१ तोफांची सलामी देण्यात आली.’’

भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी बरोबर २ वर्षे म्हणजे १५ ऑगस्ट १९४५ ला जपानने शरणागती पत्करली आणि दुसरं महायुद्ध संपलं. यानंतर जपानचा ताबा काही काळापुरता अमेरिकन आणि ब्रिटिश सरकारांकडे होता. यावेळी अमेरिकन आणि ब्रिटिश सैन्य जपानमध्ये तळ ठोकून होतं. यामध्ये होती ती मराठा लाईट इंन्फट्रीची पहिली पलटण ही मार्च १९४७ ला जपानमध्ये दाखल झाली. एव्हाना भारताला स्वातंत्र्य मिळण्याचे निश्चित झालेले होते आणि भारतीय फौजेतले ब्रिटिश अधिकारी हळूहळू बाहेर पडायला सुरुवात झालेली होती.

मे १९४७ ला कमांडिंग ऑफिसर म्हणजेच सीओ लेफ्टनंट कर्नल लिमिंग इतर ब्रिटिश अधिकाऱ्यांसह रेजिमेंटमधून बाहेर पडले आणि या बटालियनचा पहिला भारतीय सीओ होण्याचा मान लेफ्टनंट कर्नल दादासाहेब सुर्वे यांना मिळाला होता. अर्थात यामुळे प्रिन्सेस पार्कमध्ये फडकवण्यात आलेल्या पहिल्या सार्वजनिक ध्वजवंदनाचा मान मुळीच कमी होत नाही; पण भारताचा राष्ट्रध्वज भारताबाहेर त्या आधी साडेपाच तास आधी फडकवण्याचा मान एका मराठी माणसाला मिळाला, ही नोंद मात्र इतिहासात झाली आहे, असेही ते सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT