कागल, ता. २७ : ‘जयंत पाटील एका घटनेमुळे बचावले, नाहीतर त्यांनी आमच्याबरोबर शपथ घेतली असती. ती गोष्ट नेमकी काय आहे, ती कधी तरी सांगेन,’ असा गौप्यस्फोट वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांचे निष्ठांवत म्हणून ओळख राहिलेल्या मंत्री मुश्रीफ यांची मैत्री जगजाहीर आहे. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत मंत्री मुश्रीफ यांची मतदारसंघातील शेवटची प्रचार सभा कागल शहरात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची झाली आहे.
राज्यात झालेल्या राजकीय घडमोडीत मंत्री मुश्रीफ हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेले. जयंत पाटील मात्र शरद पवार यांच्यासोबत राहिले. इचलकरंजी येथे दसऱ्यादिवशी झालेल्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी भाजपचा भस्मासूर गाडण्यासाठी मंत्री मुश्रीफ यांना पाठविले आहे, असे वक्तव्य केले होते.
याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी जयंत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, ‘वास्तविक जयंत पाटील यांच्यासारख्या माणसाने असे वक्तव्य करणे अयोग्य होते. कारण काही एका घटनेमुळे ते बचावले, नाही तर त्यांनी आमच्याबरोबर शपथ घेतली असती.
तो इतिहास मी आता सांगत बसत नाही. तो गोपनीय आहे. परंतु ज्या पक्षासोबत आम्ही गेलो आहोत, त्यांच्याशी ईमान ठेवणे व त्यांच्यासाठी जीवाचे रान करणे हा माझा स्वभाव आहे. आता आम्ही भूमिका बदलली आहे. त्या भूमिकेशी प्रामाणिक राहणे हे आमचे कर्तव्य आहे.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.