jayant Patil sakal
कोल्हापूर

नवा ट्विस्ट: जयंत पाटलांच्या उजवीकडे सुमनताई तर डावीकडे संजयकाका

अजित झळके

सांगली : जिल्ह्याच्या राजकारणातील जाणकारांच्या भुवया उंचावणारे चित्र खासदार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) यांच्यानिमित्ताने सतत समोर येत आहे. आजही कवठेमहांकाळ तालुक्यात त्यांनी टेंभू योजनेच्या पाणी पूजन समारंभात पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीत हजेरी लावली. विशेष बाब म्हणजे जयंत पाटील हे पाण्यात श्रीफळ अर्पण करत असताना त्यांच्या उजवीकडे आमदार सुमनताई आर. आर. पाटील होत्या तर डावीकडे होते संजयकाका पाटील. हा जिल्ह्याच्या राजकारणातील नव्या नांदीचा ट्रेलर तर नाही, असेच चित्र चर्चेत आले.

खासदार संजय पाटील यांचा राष्ट्रवादीसोबतचा वाढता घरोबा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी त्यांनी फारच जुळवून घेतले आहे. भाजपच्या प्रमुख कार्यक्रमांना त्यांची हजेरी असते, मात्र जयंतरावांचे सार्वजनिक कार्यक्रमही ते चुकवत नाहीत, हे नजरेतून सुटलेले नाही. महापौर निवडीत राष्ट्रवादीने भाजपला सत्ता असताना धोबीपछाड दिल्यानंतर जयंत पाटील यांच्या एका कार्यक्रमावर भाजपने बहिष्कार घातला होता, त्या कार्यक्रमात संजयकाका मात्र हजर राहिले होते. आजही त्यांनी हजेरी लावून लक्ष वेधून घेतले. अर्थात, ते कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष असताना टेंभू योजनेच्या सदर कामासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते. त्यामुळे त्यांच्या हजेरीकडे केवळ राजकीय दृष्टीने पाहणे योग्य होणार नाही, असा युक्तीवाद त्यांचे समर्थक नक्कीच करतील.या साऱ्यात जयंत पाटील यांच्याकडून सुरु असलेली राजकीय आखणी अधिक चर्चेचा विषय बनली आहे.

दिवंगत आर. आर. पाटील गटाच्या तासगाव-कवठेमहांकाळ येथील प्रभावाला संजय पाटीलच आव्हान ठरू शकतात. अशावेळी ते आर. आर. गटाचे पारंपारिक विरोधक संजयकाकांना कशी ताकद देत आहेत, असाही मुद्दा चर्चेला येत असतो. त्याचवेळी संजयकाकांनी गेल्या काही काळात आर. आर. गटाविरुद्ध सौम्य भूमिका घेतली आहे. त्यामुळे भविष्यातील राजकारणात नवा ट्विस्ट आला तर आश्‍चर्य वाटायला नको. त्यामुळे जयंतरावांच्या उजवीकडे सुमनताई आणि डावीकडे संजयकाका हे चित्र भविष्यातील नव्या राजकीय स्थितीचा ट्रेलर असू शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT