जयसिंगपूर : ‘बांधकाम कामगारांना दुपारचे व रात्रीचे मोफत भोजन ही महाविकास आघाडी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या जेवणाचा दर्जा ढासळला अथवा जेवण वेळेत न मिळाल्यास थेट मला फोन करा,’ असे आवाहन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी कामगारांना केले. बांधकाम व इतर कामगारांची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे, ती करून मंडळाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
येथे बांधकाम कामगारांच्या मोफत जेवण वाटप योजनेला प्रारंभ झाला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ बोलत होते. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर अध्यक्षस्थानी होते. श्री यड्रावकर म्हणाले, ‘काबाडकष्ट करणाऱ्या कामगारांना पौष्टिक व दर्जेदार अन्न मिळावे, या भावनेतून मंत्री मुश्रीफ यांनी ही अभिनव योजना सुरू केली आहे. इमारत बांधकाम व इतर कामगार मंडळाच्या माध्यमातून कामगारांसह त्याच्या कुटुंबीयांचीही कोटकल्याण करणाऱ्या योजना या मंडळामार्फत राबविल्या जात आहेत.’
यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, प्रांताधिकारी विकास खरात, सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव, आयटकचे दिलीप पवार, आनंदा गुरव, भारतीय मजदूर संघाचे अभिजित केकरे, मनसेचे संघटक राजू निकम, आर्किटेक्ट इंजिनिअर असोसिएशनचे अध्यक्ष राजू देसाई, उपाध्यक्ष रवींद्र चौगुले, नितीन पाटील, मिश्रीलाल जाजू, शामराव कुलकर्णी, रघुनाथ देशिंगे आदी उपस्थित होते. इंजिनिअर नितीन पाटील यांनी स्वागत केले. अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी प्रास्ताविक केले. सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी आभार मानले.
शेतमजुरांचेही कल्याणकारी मंडळ
मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘जनतेने मला जी जी संधी दिली, तीचे जनतेसाठी सोनं करण्यात मी यशस्वी झालो. शेतमजुरांसह रिक्षा, ट्रॅक्स, टेम्पो व ट्रक ड्रायव्हर यांचेही महामंडळ लवकरच स्थापन करणार आहोत.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.