कोल्हापूर : कोविड सेंटर(covid center) म्हणलं की एक गंभीर वातावरण असंच चित्र सध्या उभं केलं जात आहे. कोरोनाच्या भीतीच्या छायेखाली असणारे रुग्ण पाहिले की अनेकांच्या मनात घबराट निर्माण होते, पण कोरोना हा नक्कीच बरा होणारा रोग आहे. आजूबाजूच्या लोकांकडून सकारात्मक ऊर्जा मिळाल्यास तो रुग्ण बरा होतो या उद्देशाने जयसिंगपूर (Jaysingpur) (जि कोल्हापूर) येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sanghatana) वतीने उभारण्यात आलेल्या शिवार कोविड सेंटर सेंटरमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.(jaysingpur covid center interment atmosphere marathi news)
याअंतर्गत शनिवारी (ता.29) सायंकाळी संगीतमय मैफल झाली. सुरक्षित अंतर राखत कोविड रुग्णांनी विविध गाण्यांचा आनंद घेतला. स्वतः माजी खासदार राजू शेट्टी ही या मैफलीत सहभागी झाले. रुग्णांना दिलासा दिला. या संगीतमय सोहळ्यामुळे आपल्याला कोविड झाला आहे हे रुग्ण काही काळ विसरून गेले. धीर गंभीर वातावरण निर्माण करून रुग्णांमध्ये घबराहट निर्माण करण्या ऐवजी असे उपक्रम राबवून रुग्ण जास्तीत जास्त लवकर बरे व्हावेत या साठी आपला प्रयत्न असल्याचे शिवार कोविड सेंटर च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.